मुंबई - योग्य उपचार घेतल्यास कॅन्सरवर मात करता येते असा संदेश मुंबई मॅरेथाॅनेमध्ये देण्यात येत आहे. उपचार घेतल्याने अनेक जण कॅन्सर मुक्त झाले असून सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगत आहेत, असा संदेश इंडियन कॅन्सर सोसायटीच्या वतीने देण्यात आला. शेकडो कॅन्सर पीडितांनी मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन कॅन्सर बाधितांना प्रोत्साहन दिले. टाटा मुंबई मॅरेथॉन आज मुंबईत संपन्न झाली. दरम्यान, ड्रीम्स रन या उपक्रमांतर्गत विविध प्रबोधनात्मक विषयांवर मार्गदर्शन करणाऱ्या अनेक संघटनाने भाग घेत जनजागृती केली.
कॅन्सरबाबत समाजात गैरसमज - कॅन्सरबाबत समाजात आजही नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. तसेच हा आजार दुर्धर असल्याने बरा होऊ शकत नाही अशी अनेकांची धारणा असते. मात्र, तात्काळ उपचार केल्यास कॅन्सरसारख्या आजारावर मात करता येते. मुंबईसह देशभरात अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी कॅन्सरवर मात केल्याचे इंडियन कॅन्सर सोसायटीचे जनरल डेप्युटी डायरेक्टर ए. आर. कादर यांनी सांगितले.
कॅन्सर बाधितांसाठी मदतीचा हात - अपेक्स बॉडी कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, चाईल्ड कॅन्सर अशा, दुर्धर आजाराबाबत आमची संस्था मोहीम राबवत आहे. आज कॅन्सरवर मात देऊन अनेक जण नॉर्मल लाईफ जगत आहेत. त्यांना सोबत घेऊन आम्ही मुंबई मॅरेथॉनमध्ये धावत आहोत. तसेच कॅन्सर बाधितांसाठी आम्ही मदतीचा हात देखील पुढे करत आहोत. कॅन्सरमुक्त मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. कॅन्सरबाबत जनजागृती करण्याचे काम संस्थेमार्फत केले जाते, असे कादर यांनी सांगितले.
चाइल्ड कॅन्सरचे प्रमाण लक्षणीय - चाइल्ड कॅन्सरचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र वेळीच उपचार केल्यानंतर हा आजार बरा होतो. सुमारे 80 टक्के मुलांचा यात आतापर्यंत समावेश आहे. आमच्यासोबत आज कन्सरमुक्त झालेले 40 मुलं आहेत. जी सर्वसामान्यांसारखे जीवन जगत आहेत. कोणीही घाबरण्याचं कारण नाही तात्काळ उपचार घेतल्यास कॅन्सरबरा होतो. त्यामुळे न घाबरता, न खचता या रुग्णाचा सामना करा असे आवाहन कर्नल कादर यांनी केले.
हेही वाचा - Breast cancer : स्तनाच्या कर्करोगाची 'ही' आहेत लक्षणे, योग्य उपचार न केल्यास होऊ शकतो मृत्यू