ETV Bharat / state

Patrachawl Protest Mumbai: पत्राचाळीतील नागरिकांचे फ्लॅटच्या ताब्यासाठी मानवी साखळी आंदोलन; शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

मुंबईतील पत्राचाळ ही गेल्या पाच वर्षांपासून प्रसिद्ध झाली आहे ती या चाळीतील घोटाळ्यामुळे. या जमिनीच्या जागेवर नवीन इमारत विकासकाने तयार केलेले फ्लॅट ग्राहकांनी 2017 मध्ये बूक करून विकत घेतले. पण त्यांना अजूनही फ्लॅटचा ताबा मिळालेला नाही की मालकी मिळाली नाही. 1800 फ्लॅट धारकांनी (ग्राहक) या विरोधात मानवी साखळी आंदोलन करून राज्य सरकार आणि म्हाडाचे अधिकारी यांचे लक्ष वेधून घेतले.

Patrachal protest Mumbai
पत्राचाळ आंदोलन
author img

By

Published : Feb 5, 2023, 5:32 PM IST

पत्राचाळ धारकांचे मानवी साखळी आंदोलन

मुंबई : पत्राचाळीतील रहिवाशीयांनी म्हाडा, रेरा आणि राज्य सरकारकडे दाद मागितली. पण, न्याय न मिळाल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला. आज (रविवारी) पत्राचाळीत भाजप खासदार गोपाळ शेट्टी आले आणि हा प्रश्न समजून घेत सदनिका धारकांना लवकरात लवकर घर मिळवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. ज्या अधिकाऱ्यांमुळे विलंब झाला त्यांच्यावरही कारवाही करण्याची मागणी खासदार शेट्टी यांनी दिली. आम्ही रजिस्ट्रेशन फी आणि बिल्डरला पैसेही दिले. पण, अद्यापही फ्लॅटचा ताबा मिळाला नाही. तो लवकरात लवकर मिळावा अशी मागणी संबंधित ग्राहकांनी केली. त्यासाठी मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले असल्याचे आंदोलकानी सांगितले. मुंबईतील पत्राचलमध्ये राहणाऱ्या लोकांना आणि फ्लॅटधारकांना १५ वर्षानंतरही घर मिळालेले नाही.

ग्राहकांचा मूक आंदोलनाचा इशारा : पत्राचाळच्या बिल्डरकडून ज्यांनी 10 वर्षांपूर्वी सदनिका विकत घेतल्या होत्या, ते मानवी साखळी करून बिल्डर आणि सरकारविरोधात मूक आंदोलन करणार आहेत. या निदर्शनात खासदार गोपाळ शेट्टी, खासदार गजानन कृतीकर यांच्यासह हजारो लोक सहभागी होणार आहेत. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी इमारतीला ओसी न मिळाल्याने हजारो लोक बिल्डरच्या ऑफिसच्या पायऱ्या झिजवत आहेत. हे लोक अनेक दिवसांपासून कर्जाचे हप्ते भरत आहेत; पण आम्हाला सरकारकडून कोणताही दिलासा मिळत नाही.

काय आहे प्रकरण ? गोरेगावमधील सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) ४७ एकरांवर पसरले आहे. यामध्ये ६७२ कुटुंबे भाड्याने राहतात. 2008 मध्ये, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) या सरकारी संस्थेने चाळीच्या पुनर्विकासाचे कंत्राट गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (GACPL), हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (HDIL) च्या उपकंपनीला दिले. जीएसीपीएलने भाडेकरूंसाठी ६७२ फ्लॅट तयार करायचे होते. यापैकी काही फ्लॅट म्हाडालाही द्यायचे होते. उर्वरित जमीन खासगी विकासकांना विकता आली असती; परंतु गेल्या 14 वर्षांत भाडेकरूंना एकही फ्लॅट मिळालेला नाही. कारण कंपनीने पत्राचाळचा पुनर्विकास केला नाही आणि जमिनीचे पार्सल 1,034 कोटी रुपयांना इतर बिल्डरांना विकले, असे ईडीच्या म्हणण्यानुसार माहिती.

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरण : प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्यात पत्राचाळ प्रकरणात आर्थिक व्यवहार जरी झाले असले. तरी पत्राचाळ प्रकणातील पैसा आर्थिक गैरव्यवहारातील असल्याचे पुरावे दाखवा. काही रक्कम प्रवीण राऊतांकडून संजय राऊत यांना देण्यात आली होती. मात्र, याचा काहीच कायदेशीर पुरावा नाही की ती रक्कम गुन्ह्यातुन मिळालेली रक्कम होती. असा युक्तीवाद राऊतांचे वकिल अशोक मुंदरगींनी कोर्टात केला होता.

वकील अशोक मुंदरगींचा युक्तिवाद : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबर, 2022 रोजी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्यात पत्राचाळ प्रकरणात आर्थिक व्यवहार जरी झाले असले. तरी पत्राचाळ प्रकणातील पैसा आर्थिक गैरव्यवहारातील असल्याचे पुरावे दाखवा. काही रक्कम प्रवीण राऊतांकडून संजय राऊत यांना देण्यात आली होती. मात्र, याचा काहीच कायदेशीर पुरावा नाही की ती रक्कम गुन्ह्यातुन मिळालेली रक्कम होती. असा युक्तीवाद राऊतांचे वकिल अशोक मुंदरगींनी कोर्टात केला होता.

हेही वाचा : Maharashtra Assembly By Election: कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध कराव्यात, राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला केले आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.