ETV Bharat / state

'अशाप्रकारे' धारावीतील कोरोना आला आटोक्यात - धारावीतील कोरोनाची बातमी

अशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या मुंबईच्या धारावीत कोरोनाने शिरकाव केला होता. मात्र, अत्यंत दाटावाटीने घरे असलेल्या या झोपडपट्टीन सामाजिक अंतर ठेवणे कठीण होत होते. मात्र, तरिही सध्या धारावीत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले आहे.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Jun 27, 2020, 10:00 AM IST

मुंबई - राजधानी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना धारावी सारख्या मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाला रोखण्यात पालिकेला यश आले आहे. अगदी दाटीवाटीने लोक या भागात राहतात. त्यामुळे धारावीतील कोरोनावर नियंत्रण मिळवणे खूप आव्हानात्क काम होते. पण, नेमके कशा प्रकारे धारावीतील कोरोना नियंत्रणात आला याबाबात पालिकेच्या जी नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.

यावेळी बोलताना दिघावकर म्हणाले, आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. धारावीत अडीच चौरस किलोमीटर परिसरात 9 ते 10 लाख नागरिक राहतात. लहान घरे असल्याने धारावी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे कठीण होते. याठिकाणी स्थलांतरित कामगारांचाही प्रश्न होता. मात्र, आम्ही 'चेस द व्हायरस' ही योजना या ठिकाणी राबवल्याचे दिघावकर यांनी सांगितले. धारावीमधील 47 हजार लोकांची स्क्रिनिंग आम्ही केली. फिव्हर कॅम्प सुरू केले. त्यामधून समोर आलेल्या संशयित रुग्णांना क्वारंटाइन करण्यात येत होते. धारावीमधून 11 हजार संशयितांना क्वारंटाइन करण्यात आले होते. धरावी सारख्या वस्तीत आम्ही खासगी डॉक्टरांना विनंती करून त्यांचे क्लिनिक सुरू केले. डॉक्टरांना रुग्णांची तपासणी करण्याचे आवाहन केले. खासगी रुग्णालय ताब्यात घेतले. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शाळा, हॉटेल या ठिकाणी क्वारंटाइन सेंटर सुरू केले. कम्युनिटी किचन सुरू करून नागरिकांना अन्नाचे वाटप केल्याचेही दिघावकर यांनी सांगितले.

धारावीत सर्वात मोठे आव्हान होते ते सोशल डिस्टनसिंगचे. या ठिकाणी टाळेबंदी आहे की नाही हा प्रश्न पडत होता. रमजानमध्ये क्वारंटाइन असलेल्या मुस्लीम बांधवांनाही त्यांनी उपवास कसा करायचा हा मोठा प्रश्न पडला होता. मात्र, आम्ही 11 हजार इफ्तारी पाकिटांचे वाटप केले. तसेच रुग्णांच्या जेवणाची योग्य काळजी घेतली, असे दिघावकर यांनी सांगितले.

मागील 10 ते 15 दिवसात रुग्णांची संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. 7 ते 15 रुग्ण या विभागात आढळून येत आहेत. रुग्ण कमी झाल्याने ट्रेसिंगचे प्रमाणही कमी झाले आहे. आमच्याकडे 11 क्वारंटाइन सेंटर होती त्यामध्ये 4 हजार रुग्णांना क्वारंटाइन करण्याची क्षमता होती. आम्ही 200 बेडचे रुग्णालय उभारले आहे. खासगी रुग्णालय आणि नर्सिंग होम ताब्यात घेतली आहेत. त्याठिकाणी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आता रुग्ण नसल्याने धारावीतील क्वारंटाइन सेंटर सॅनिटाइझ करून पुन्हा संबंधित प्रशासनाच्या ताब्यात दिल्याची माहिती दिघावकर यांनी दिली.

पावसाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याबाबत बोलताना आता नागरिकांचा सरकारवर आणि महापालिकेवर चांगल्या प्रकारे विश्वास बसला आहे. आम्ही नागरिकांना काही लक्षणे असल्यास समोर यायचे आवाहन केले आहे. आता सुरू असलेली फिव्हर क्लिनिक पावसाळ्यातही सुरू राहणार आहे. कोरोनासह डेंग्यू मलेरिया यासारखे आजार पावसाळ्यात होतात. त्यावरही आम्ही उपचार करणार असल्याचे दिघावकर यांनी सांगितले.

देशभरात धारावी पॅटर्नची चर्चा
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. धारावीमधील कोरोनाचे रुग्ण कमी करण्यासाठी पालिकेने ट्रेसिंग आणि क्वारंटाइन करण्यावर भर दिला. फिव्हर क्लिनिक सुरू करण्यात आले. आज धारावीतील रुग्ण संख्या कमी झाली आहे. झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार रोखण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे. धारावीत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे धारावी पॅटर्नबाबत आज देशभरात चर्चा केली जात आहे. आज हेच धारावी पॅटर्न दिल्लीमध्ये राबण्याची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा - मुंबईत 'प्लाझ्मा' थेरपी यशस्वी; नायर रुग्णालयातील 15 रुग्णांची कोरोनावर मात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.