ETV Bharat / state

लिलावानंतरही 'डॉन'च्या भीतीपोटी 24 वर्षांपासून मालमत्तेचा ताबा मिळेना; काय आहे नेमकं प्रकरण?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 10:01 PM IST

Updated : Jan 5, 2024, 6:29 AM IST

Don Dawood Ibrahim Properties Auction : दाऊद इब्राहिम कासकर अर्थात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या आतापर्यंत 11 मालमत्तांचा लिलाव करण्यात आला आहे. मात्र, लिलावानंतरही बोली लावणाऱ्यांना दाऊदच्या मालमत्तेचा ताबा मिळालेला नाही. जाणून घ्या सविस्तर....

Underworld don Dawood Ibrahim
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम

मुंबई Don Dawood Ibrahim Properties Auction : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या आईच्या चार मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव होणार आहे. या चार मालमत्ता रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके गावात आहेत. दाऊदची आई अमीना बी हिच्या नावावर शेतजमिनीच्या स्वरुपात चार मालमत्ता आहेत. त्यांचा लिलाव शुक्रवारी होणार आहे.

Underworld Don
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम

सेफेमा कायद्याअंतर्गत होणार लिलाव : अधिकाऱ्यांनी गेल्या नऊ वर्षांत दाऊदसह त्याच्या नातेवाईकांच्या सुमारे 11 मालमत्तांचा लिलाव केला आहे. हा लिलाव चर्चगेट येथील आयकर भवनात ऑनलाइन पद्धतीनं होणार आहे. यापूर्वीही दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील अनेक मालमत्तांचा सेफेमा कायद्याअंतर्गत (Smugglers and Foreign Exchange Manipulators Act) लिलाव करण्यात आलाय.

उर्वरित मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव : दाऊदच्या मुंबई, रत्नागिरीतील मालमत्तांच्या लिलावात सफेमा (स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिपुलेटर्स ॲक्ट) कायदा 1976 अंतर्गत समावेश करण्यात आला होता. हा कायदा तस्करीला आळा घालण्यासाठी बनवण्यात आलाय. या कायद्यानुसार भारत सरकारनं दाऊदची मालमत्ता जप्त केली होती. उर्वरित मालमत्तांचा उद्या लिलाव होणार आहे.

अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेना : या लिलाव प्रक्रियेत सामील होण्यासाठी वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी काल नामांकन प्रक्रिया पूर्ण केलीय. याबाबत त्यांनी ईटीव्ही भारतला सांगितलं की, 'प्रशासक म्हणून नेमलेल्या अधिकारी सुरभी शर्मा, सफेमाचे सक्षम अधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांचं कोणतेही सहकार्य मिळत नाहीय'.

25 वर्षांपूर्वी दाऊदच्या नावाची भीती : 25 वर्षांपूर्वी दाऊदच्या मालमत्तेच्या लिलावात सहभागी होण्याचं धाडस कोणी दाखवत नव्हतं. डिसेंबर 2000 मध्ये दाऊदच्या पहिल्या मालमत्तेचा लिलाव झाला होता. त्यावेळी कुलाब्यातील हॉटेल डिप्लोमॅटमध्ये दाऊदच्या अकरा मालमत्तांचा लिलाव करण्यात आला. त्यानंतर 11 मालमत्तांच्या लिलावात कोणीही सहभागी झालं नव्हतं. त्यावेळी दाऊदच्या नावाची भीती होती. या मालमत्तेचा कवडीमोल भावानं लिलाव होणार होता. त्यानंतर मार्च 2001 मध्ये त्याच मालमत्तांचा पुन्हा लिलाव करण्यात आला. त्यावेळी वकील अजय श्रीवास्तव कुलाबा येथील हॉटेल डिप्लोमॅटमध्ये लिलावात सहभागी झाले होते. त्यांनी दाऊदच्या दोन मालमत्ता खरेदी केल्या होत्या. अजय श्रीवास्तव यांनी नागपाडा येथे दोन व्यावसायिक गाळ्यासाठी बोली लावली होती.

24 वर्षांपासून मालमत्तांचा ताबा मिळेना : मात्र, अजय श्रीवास्तव यांना गेल्या 24 वर्षांपासून त्या मालमत्तेचा ताबा मिळालेला नाहीय. या दोन्ही मालमत्ता दाऊदची बहीण हसिना पारकरच्या नावावर होत्या. त्यानंतर अजय श्रीवास्तव यांनी मालमत्तेचा ताबा मिळावा, यासाठी स्मॉल कॉज कोर्टात केस दाखल केली होती. दहा वर्षांनंतर 2011 मध्ये न्यायालयानं दोन्ही व्यावसायिक भूखंड अजय श्रीवास्तव यांना देण्याचा निर्णय दिला. मात्र तरीही अजय श्रीवास्तव यांना ताबा मिळाला नाही. कारण हसीना पारकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. त्यानंतर 2014 मध्ये हसीना पारकर यांचं निधन झालं होतं. त्यामुळं आता हसीना पारकर यांच्या मुलाच्या ताब्यात ही मालमत्ता आहे.

दाऊदच्या साथीदारांकडून धमक्या : लिलावात खरेदी केलेल्या दाऊदच्या मालमत्तेचा ताबा मिळावा यासाठी वकील अजय श्रीवास्तव आजपर्यंत न्यायालयात चकरा मारत आहेत. दरम्यान, श्रीवास्तव यांना दाऊदच्या साथीदारांकडून अनेक धमकीचे फोन आले आहेत. त्यानंतर, त्यांना दिल्ली पोलिसांनी सुरक्षाही पुरवली होती. दाऊदचा जन्म झालेल्या रत्नागिरीतील बंगल्याचा लिलाव 2020 मध्ये करण्यात आला होता. या बंगल्यासाठी ॲड. अजय श्रीवास्तव यांनी पुन्हा लिलावात बोली लावली होती. मात्र, चार वर्षांनंतरही श्रीवास्तव यांना या बंगल्याचा ताबा मिळालेला नाही. कागदपत्रांवरील सर्व्हे नंबर चुकीचा असल्यानं अजय श्रीवास्तव यांच्या नावावर मालमत्ता नोंदणीकृत झाली नाही. श्रीवास्तव यांना त्या ठिकाणी सनातन धर्म पाठशाळा बांधायची होती. मात्र त्यांचं हे स्वप्न अपूर्ण राहिलंय. 2001 मध्ये, श्रीवास्तव कुलाबा येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या लिलावात सामील झाले होते. त्यानंतर मिळालेल्या प्रसिद्धीमुळे जैन बांधवही 'या' लिलावात सामील झाले.

लिलावात कोण सामील होणार? : त्यानंतर दिल्लीस्थित व्यापारी पियुष जैन, हेमंत जैन यांनी लिलावात बोली लावली होती. बोली नंतर ताडदेव परिसरातील उमरा इंजिनिअरिंग वर्क्स हे दुकान त्यांना मिळालं होतं. मात्र, या दुकानाचा अकरा वर्षांनंतरही जैन बांधवांना ताबा मिळालेला नाही. तसंच आचार्य चक्रपाणी यांनीही दाऊदची मोडकळीस आलेली कार लिलावात विकत घेऊन जाळली होती. तसंच दाऊदच्या आंब्याच्या बागेचाही 2020 मध्ये लिलाव करण्यात आला होता. त्यावेळी आंब्याची बाग वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी विकत घेतली होती. त्यामुळे उद्या दाऊदच्या मालमत्तेच्या लिलावात कोण सामील होणार? किती मालमत्तांची विक्री होणार याकडं देशाचं लक्ष लागलंय.

हेही वाचा -

  1. Year Ender 2023 : मुंबई पोलिसांनी ड्रग्जची पाळंमुळं केली उद्ध्वस्त; जाणून घ्या वर्षभरातील महत्वाच्या गुन्ह्याच्या घटना
  2. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या संपत्तीचा पुन्हा होणार लिलाव, रत्नागिरीतील चार संपत्तीचं 5 जानेवारीला ऑक्शन
  3. दाऊदच्या माणसांनी ठिकाणा कळू नये म्हणून गाडी फिरवून-फिरवून नेली होती त्याच्या घरी, ऋषी कपूर यांनी सांगितला होता दाऊद भेटीचा किस्सा

Last Updated : Jan 5, 2024, 6:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.