ETV Bharat / state

बांद्रा ते डोंगरी... मुंबईत याआधी या ठिकाणी कोसळल्या बहुमजली इमारती

इमारत कोसळण्याच्या घटनेमुळे मुंबईत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या आधीही मुंबईत कोठे इमारती कोसळल्या होत्या. याबाबचा आढावा

author img

By

Published : Jul 16, 2019, 1:34 PM IST

Updated : Jul 16, 2019, 2:26 PM IST

या ठिकाणी कोसळल्या बहुमजली इमारती

मुंबई - शहरातील डोंगरी परिसरात इमारत कोसळल्याची घटना आज घडली आहे. निषणपडा अब्दुल रेहमान शहा दर्ग्याच्या मागे ही इमारत होती. केसरबाई असे या कोसळलेल्या इमारतीचे नाव आहे. यात ४० ते ५० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या आधीही मुंबईत इमारती कोसळल्या होत्या. याबाबतचा आढावा

*२०१३ साली मुंबईतील माझगाव भागामध्ये ४ मजली इमारत कोसळली होती. यामध्ये ६१ लोकांना जीव गमवावा लागला होता, तर ३२ जण जखमी झाले होते.

*२०१३ साली ठाण्यामध्ये इमारत कोसळून ७४ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये १८ मुलांचा आणि २३ महिलांचा समावेश होता.

*२००७ साली मुंबईतील बोरीवली परिसरात लक्ष्मी छाया नावाची इमारत कोसळली. यामध्ये तीस जणांचा मृत्यू झाला. अनधिकृत बांधकामाचा प्रयत्न करण्यात आल्याने ही इमारत कोसळली.

*ऑगस्ट २००५ - मध्य मुंबईतील नागपाडा परिसरामध्ये इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला. तर २४ जण जखमी झाले. ही इमारत कोसळण्याच्या ३ दिवस आधी म्हाडाने इमारतीला सुरक्षित घोषित केले होते.

*जून २००५ - खार भागामध्ये अनधिकृत बांधकाम केल्यामुळे इमारत कोसळली होती. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता. ३ वर्षांपूर्वी पालिकेने इमारत मालकाला अनधिकृत बांधकामाबद्दल नोटीस पाठवली होती.

*मार्च १९९८ - बांद्रा बागामध्ये ७ मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत ३५ जणांचा मृत्यू झाला. तर २३ जण जखमी झाले. या इमारतीचे वरचे तीन मजले अनधिकृतपणे बांधण्यात आले होते.

सप्टेंबर १९९७ - वरळीमधील पुनम चंबर्स या ७ मजली इमारतीचा काही भाग कोसळला. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 16, 2019, 2:26 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.