ETV Bharat / state

नामुष्कीजनक..! हुतात्मा गिरणी कामगारांच्या वारसांचा शोध लागेनाच, 20 राखीव घरे लॉटरीत समाविष्ट करण्याची वेळ - हुतात्मा झालेल्या 22 गिरणी कामगारांच्या वारसांना मोफत घरे

9 वर्षे पूर्ण झाली तरी 22 पैकी 20 हुतात्म्यांच्या वारसांचा शोध घेण्यात राज्य सरकार साफ अपयशी ठरले आहे. सर्व प्रकारचे प्रयत्न करून झाले, पण या 20 हुतात्म्यांच्या वारसांचा शोध लागला नसल्याचा अहवाल राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता म्हाडाने धूळ खात पडून असलेली ही घरे गिरणी कामगारांच्या लॉटरीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Feb 13, 2021, 5:31 PM IST

Updated : Feb 13, 2021, 6:10 PM IST

मुंबई - संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्मा झालेल्या 22 गिरणी कामगारांच्या वारसांना मोफत घरे देण्याची घोषणा करत सरकारने गिरणी कामगारांच्या गृह प्रकल्पातील 22 घरे राखीव ठेवली आहेत. पण, आता 9 वर्षे पूर्ण झाली तरी 22 पैकी 20 हुतात्म्यांच्या वारसांचा शोध घेण्यात राज्य सरकार साफ अपयशी ठरले आहे. सर्व प्रकारचे प्रयत्न करून झाले, पण या 20 हुतात्म्यांच्या वारसांचा शोध लागला नसल्याचा अहवाल राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता म्हाडाने धूळ खात पडून असलेली ही घरे गिरणी कामगारांच्या लॉटरीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच यासंबंधीचा प्रस्ताव गृहनिर्माण विभागाकडे पाठवत यावर अंतिम निर्णय घेण्याची विनंती करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'ईटीव्ही भारत'ला दिली.

मुंबई

येथील घरे आहेत वारसांसाठी राखीव
गिरण्यांच्या जमिनीवर गिरणी कामगारांसाठी घरे बांधत त्यांना वितरित केली जात आहेत. त्यानुसार 2012 मध्ये घोडपदेव, न्यू हिंद मिल येथील 22 घरे हुतात्मा गिरणी कामगारांच्या वारसांसाठी राखीव ठेवण्यात आली. ही घरे त्यांना मोफत देण्याचे जाहीर केले. तर या वारसांचा शोध घेत त्यांची पात्रता निश्चित करण्याची जबाबदारी गृहनिर्माण विभागावर टाकण्यात आली. म्हाडावर फक्त घराचे वितरण करण्याची जबाबदारी आहे. त्यानुसार 2012 पासून गृहनिर्माण विभाग विविध माध्यमातून वारसांचा शोध घेत आहे. पण, आतापर्यंत 22 पैकी केवळ दोनच वारसांना शोधण्यात यश आले असून ही दोन घरे वितरित करण्यात आली आहेत.
गंभीर! हुतात्म्याच्या नावापलिकडे सरकारकडे काहीही माहिती नाही
105 हुतात्मा असून यातील 22 हुतात्मे गिरणी कामगार आहेत. हे कामगार हुतात्मे झाले तेव्हा त्यांचे नाव, गाव, पत्ता, घरच्यांची माहिती, कोणत्या मिलमध्ये ते काम करत होते याची माहिती त्यावेळी नोंद करणे आवश्यक होते. पण, अशी कोणतीही नोंद सरकार दरबारी नाही. ज्यांनी महाराष्ट्रासाठी आपले प्राण दिले त्यांची स्मारके उभी करण्यात आली. पण त्यांची कोणतीही माहिती वा त्यांच्या वारसाची नोंद नसावी ही मोठी शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया हेमंत राऊळ, गिरणी कामगार नेते यांनी व्यक्त केली आहे. ही माहितीच नसल्याने 9 वर्षांत केवळ दोनच वारसांना घरे देता आली. आम्हीही आमच्या परीने शोध घेतला, पण यात काही यश येताना दिसत नाही. एक तर हे कामगार हुतात्मे झाले तेव्हा त्यातील अनेक जण तरुण होते, ते एकटे नोकरीसाठी मुंबईत राहत होते. त्यांची कुटुंबे बाहेर गावी होती. त्यामुळे त्यांचे वारस कोण याची कोणतीही नोंद नाही. तर महत्त्वाचे म्हणजे काही दोन-चार वारस पुढे आले, पण त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसल्याने ते वारस असल्याचे स्पष्ट न झाल्याने ते अपात्र ठरल्याचेही चित्र आहे. एकूणच 22 पैकी दोनच वारस सापडले असून आता गृहनिर्माण विभागासह, कामगार विभागाने हात टेकत वारस काही सापडत नसून शोधमोहीम बंद असल्याचे म्हाडाला कळवल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
लवकरच म्हाडा पाठवणार प्रस्ताव
9 वर्षे झाली तरी 20 वारस सापडत नाहीत. तर आता संबंधित विभागांनीही वारस सापडण्याची शक्यता नसल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे आता धूळ खात पडून असलेली घरे सर्वसामान्य गिरणी कामगारांच्या उपयोगी येतील, असे म्हणत म्हाडाने आता ही घरे गिरणी कामगारांच्या लॉटरीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, यासाठी सरकारची मंजुरी आवश्यक असणार आहे. त्यामुळे लवकरच असा प्रस्ताव सरकारकडे सादर केला जाईल, असेही अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, ही घरे लॉटरीत आल्यानंतर जर कुणी वारस पुढे आला आणि तो पात्र ठरला तर त्याला इतरत्र उपलब्ध असलेली घरे वितरित करण्याची भूमिका म्हाडाची आहे. म्हाडाच्या या भूमिकेचे राऊळ यांनीही स्वागत केले. कारण आज हजारो कामगार हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असताना 20 घरे वर्षानुवर्षे पडून आहेत. वारसांचा शोध लागत नाही. तेव्हा ही घरे सर्वसामान्य कामगारांना घरे देणे योग्य होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तेव्हा आता सरकार याबाबत नेमकी काय भूमिका घेते, म्हाडाचा प्रस्ताव मंजूर करते का हे पाहणे आवश्यक आहे.
22 हुताम्यांची नावे अशी -
1) भिकाजी पांडुरंग रंगाटे - रंगाटे यांच्या पत्नी चंद्रभागा रंगाटे यांना घर वितरीत
2) कृष्णाजी शिंदे- शिंदे यांच्या पत्नी रुक्मिणी शिंदे यांना घर वितरीत
3) वासुदेव सूर्याजी मांजरेकर - वारस बेपत्ता
4) बबन बापू भरगुडे - वारस बेपत्ता
5) विष्णू सखाराम बने - वारस बेपत्ता
6) रामा लखन विंदा- वारस बेपत्ता
7) परशुराम अंबाजी देसाई- वारस बेपत्ता
8) घनश्याम बाबू कोलार- वारस बेपत्ता
9) धोंडो राघो पुजारी- वारस बेपत्ता
10) हृदयसिंग दारजेसिंग- वारस बेपत्ता
11) पांडू माहादू अवरीरकर- वारस बेपत्ता
12) रघुनाथ सखाराम बीनगुडे- वारस बेपत्ता
13) काशिनाथ गोविंदर चिंदरकर- वारस बेपत्ता
14) सुखालाल रामलाल बसकर- वारस बेपत्ता
15) सीताराम दुलाजी घाडीगावकर- वारस बेपत्ता
16) निवृती विठोबा मोरे- वारस बेपत्ता
17) भाऊ सखाराम कदम- वारस बेपत्ता
18) पांडुरंग बाबाजी जाधव- वारस बेपत्ता
19) सीताराम गयादीन- वारस बेपत्ता
20) गोपाळ चिमाजी कोरडे- वारस बेपत्ता
21) सदाशिव भोसले- वारस बेपत्ता
22) 22 वे नावच यादीत नाही

Last Updated : Feb 13, 2021, 6:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.