ETV Bharat / state

मुलीचे प्रेमसंबंध उघड, बदनामीच्या भीतीने आईसह भावाने काढला काटा - प्रेमसंबंधामुळे आईनेच केली मुलीची हत्या

आपल्या पोटच्या मुलीचे शेजारच्या युवकासोबत असलेले प्रेमसंबंध लक्षात आल्यानंतर पालकांनी त्यास विरोध केला. मात्र, यानंतरही मुलगी ऐकत नसल्याने, आपली समाजात बदनामी होईल या भीतीने तिची हत्या करणार्‍या आईला आणि भावाला पायधुनी पोलिसांनी अटक केली आहे.

बदनामीच्या भीतीने आई आणि भावानेच केली हत्या
author img

By

Published : Nov 20, 2019, 5:34 PM IST

मुंबई - पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑनर किलिंगच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आपल्या पोटच्या मुलीचे शेजारच्या युवकासोबत असलेले प्रेमसंबंध लक्षात आल्यानंतर पालकांनी त्यास विरोध केला. मात्र, यानंतरही मुलगी ऐकत नसल्याने, आपली समाजात बदनामी होईल या भीतीने तिच्या आई व भावाने तिची हत्या केली. या प्रकरणी पायधुनी पोलिसांनी आई आणि भावाला अटक केली आहे.

पापू वाघेला (40) आकाश वाघेला ( 20) अशी आरोपींची नावे आहेत.

गेल्या काही वर्षांपासून पायधुनी परिसरात राहणाऱ्या निर्मला वाघेला (23) या युवतीचे तिच्याच परिसरातल्या एका युवकसोबत प्रेम संबंध होते. या गोष्टीची कल्पना मयत मुलीच्या आईला व भावाला होती. सुरुवातीला मुलीची समजूत घातल्यानंतर ही काही फरक पडत नसल्यामुळे मुलीचे तिच्या आई व भावासोबत सतत भांडण होत होते.

प्रणय अशोक, डीसीपी

17 नोव्हेंबर रोजी मृत निर्मला हिचे प्रेम प्रकरणावरून तिच्या आई व भावासोबत पुन्हा भांडण झाले होते. यावेळेस मी घरातून निघून जात असल्याचे निर्मला हिने सांगितल्यानंतर आई पापू वाघेला हिने ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. यामध्ये तिच्या मुलानेही तिची मदत केल्याचे पोलीस तपासात समोर आल्यानंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Intro:मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीती ऑनर किलिंगच्या घटनेमुळे खळबळ माजलेली आहे .आपल्या पोटच्या मुलीचे शेजारच्या युवकासोबत असलेले प्रेमसंबंध लक्षात आल्यानंतर त्यास विरोध करूनही मुलगी ऐकत नसल्यामुळे , आपली समाजात बदनामी होईल या भीतीने तिची हत्या करणार्‍या आईला व मयत मुलीच्या भावाला पायधुनी पोलिसांनी अटक केलेली आहे.Body:याप्रकरणी पोलिसांनी पापू वाघेला (40) आकाश वाघेला ( 20) या आरोपींना अटक केली आहे .गेल्या काही वर्षांपासून पायधुनी परिसरात राहणाऱ्या निर्मला वाघेला (23) या युवतीचे तिच्याच परिसरातल्या एका युवकसोबत प्रेम संबंध होते. या गोष्टीची कल्पना मयत मुलीच्या आईला व भावाला होती , सुरुवातीला मुलीची समजूत घातल्यानंतर ही काही फरक पडत नसल्यामुळे मयत निर्मला वाघेला हिचे तिच्या आई व भावासोबत सतत भांडण होत होते. 17 नोव्हेंबर रोजी मयत निर्मला वाघेला हिच तिच्या आई व भावासोबत तिच्या प्रेम प्रकरणावरून पुन्हा भांडण झाले होते. यावेळेस मी घरातून निघून जात असल्याचे निर्मला हिने सांगितल्यानंतर निर्मला वाघेलाची आई पापू वाघेला हिने ओढणीने तिचा गळा आवळून तिचा खून केला . यामध्ये तिच्या मुलाने ही तिची मदत केल्याचं पोलीस तपासात समोर आल्यानंतर दोन्ही आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Conclusion:( बाईट - प्रणय अशोक , डीसीपी)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.