मुंबई - कोरोना रूग्ण आढळल्याने वरळी परिसर सील करण्यात आला आहे. वरळी भागात कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे. वरळी, धारावीमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख वरळीला भेट दिली. यावेळी देशमुख यांनी ड्रोनद्वारे वरळीकरांना सूचना केल्या.
दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत होत आहे. यात मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 455 वर पोहचली आहे.
नागरिकांना सूचना देण्यासाठी ड्रोनचा वापर येथे करण्यात येत आहे. अनिल देशमुख यांनी वरळीतील कोळीवाड्यात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अन्य अधिकारीही होते. नागरिकांना घराबाहेर पडू नये, घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देशमुख यांनी केले.