मुंबई - काल जो मी सायबर क्राइमचा भारतीय इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ला झाल्याचा प्रयत्न झाला होता. त्यात मी फक्त मुंबईतील इलेक्ट्रीकल इन्फ्रास्ट्रक्चर उल्लेखचा केला होता. मात्र, मुंबईच नव्हे तर संपूर्ण भारतातील इन्फ्रास्ट्रक्चरवर अशा प्रकारचा सायबर हल्ल्याचा प्रयत्न झाला असू शकतो, असा अहवाल रेकॉर्डेड फ्यूचर नेटवर्क अॅनालिसिस कंपनीने या अमेरिकेतील कंपनीने दिला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
यासंबंधी केंद्रीय मंत्री आर. के. सिंग आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात चर्चा झाली आहे. तसेच देशावर अशाप्रकारचे हल्ले होत आहेत का? याची आता पूर्ण चौकशी सुरू आहे. केवळ मुंबईची वीज या सायबर हल्ल्यामुळे गेले नसून देशात जिथे जिथे महत्त्वाचे टेक्निकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे तिथे या प्रकारचा हल्ला होऊ शकतो, अशी शंका केंद्राकडूनदेखील व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा - मुंबईच्या ब्लॅक आऊटमागे चिनी सायबर हल्ला -अनिल देशमुख
काही दिवसापूर्वी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे सर्व काम काही तास अचानक बंद पडले होते. त्यामुळे हा देखील सायबर हल्ला होता का? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. तसेच कोरोनावर लस तयार करणाऱ्या सिरम कंपनीवरदेखील सायबर हल्ले होत आहेत, अशा प्रकारची माहिती समोर येत असल्याने ही चिंतेची बाब आहे असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
घटनेबाबत -
मुंबई शहरातील लाखो ग्राहकांना मुंबईबाहेरून वीज तयार करून विविध वीज कंपन्याद्वारे वीज पुरवठा केला जातो. मात्र, 12 ऑक्टोबरला ग्रीड फेलीयरमुळे मुंबईसह बाजूच्या जिल्हयातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली होती. मुंबईत शहरात बेस्ट, पूर्व आणि पश्चिम उपनगरात अदानी तर भांडुप व मुलुंड येथे एमएसईबी या वीज कंपन्यांकडून वीज पुरवठा केला जातो. ही वीज मुंबईबाहेर बनवून या कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना पुरवली जाते. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या ग्रिडमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे मुंबईसह बाजूच्या जिल्ह्यातही वीज पुरवठा खंडित झाला. ग्रिड फेल्युअर झाल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली होती.