ETV Bharat / state

जळगाव वसतीगृहात पोलिसांनी मुलींना कपडे काढून नाचायला सांगितले, विधानसभेत गाजला मुद्दा - अनिल देशमुख जळगाव मुलींचे वसतीगृह प्रकरणाबाबत

जळगाव वसतीगृह प्रकरणाचे पडसाद सभागृहात उमटले. हा प्रकार अंत्यत निंदनीय असल्याचे सांगत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. तेव्हा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, या प्रकरणाची उच्च स्तरीय समिती स्थापन करून दोन दिवसात रिपोर्ट देण्यास सांगितले असल्याची माहिती दिली.

home minister anil deshmukh on jalgaon girls hostel incident
जळसंग्रहित छायाचित्रगाव वसतीगृह प्रकरण : अनिल देशमुखांनी दिले हे स्पष्टीकरण
author img

By

Published : Mar 3, 2021, 12:36 PM IST

Updated : Mar 3, 2021, 2:57 PM IST

मुंबई - जळगाव वसतीगृह प्रकरणाचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित करून एकच खळबळ उडवून दिली. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रश्न लावून धरत संबधित पोलीसांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली. यावेळी विरोधकांनी सभागृहात गोंधळ केला. या प्रकरणाच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली असून दोन दिवसात त्यांना अहवाल देण्याचे आदेश देण्यात आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत स्पष्ट केले. जे दोषी पोलीस असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई ही केली जाईल असे आश्वासनही त्यांनी सभागृहाला दिले.

व्हिडिओ

हेही वाचा - फडणवीस सरकारच्या काळात लावलेल्या 33 कोटी वृक्ष लागवडीची आता चौकशी होणार

काय आहे प्रकरण

जळगाव येथील शासकीय आशादीप महिला वसतीगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सामाजिक संघटनांनी मंगळवारी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यात संबंधित कृत्याचा व्हिडिओही सादर केला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी याची तातडीने दखल घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणाचे पडसाद सभागृहात उमटले.

विरोधकांनी हा प्रकार अंत्यत निंदनीय असल्याचे सांगत सत्ताधांऱ्याना धारेवर धरले. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगिलतं की, जी घटना घडली त्याची संपूर्ण माहिती घेण्याचे काम सुरु आहे. व्हिडीओ तसेच इतर सर्व माहिती एकत्र केली जात असून जबाबही नोंदवले जात आहेत. याची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देशमुख यांनी दिली. तसेच त्यांनी या प्रकरणातील दोषींवर दोनच दिवसांत कारवाई केली जाईल, असे आश्वासन देखील दिलं आहे.

मुलींना जबरदस्तीने करायला लावले नृत्य -

जननायक फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे आदींनी मंगळवारी दुपारी वसतिगृह गाठून महिला व मुलींना भेटून माहिती जाणून घेतली असता, १ मार्च रोजी काही पोलीस कर्मचारी व बाहेरील पुरुष यांनी मुलींना कपडे काढून जबरदस्तीने नृत्य करायला भाग पाडले. काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बाहेरील लोकांना व पोलिसांना चौकशीच्या नावाखाली आतमध्ये प्रवेश देऊन अनैतिक कृत्य केले जात असल्याची कैफियत काही मुलींनी मांडली. ज्या मुली चुकीच्या कृत्यांना नकार देतात, त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली जाते. सामाजिक कार्यकर्त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता, मुली बाहेरूनच खिडकीतून आपल्यावर बेतलेले प्रसंग ओरडून सांगत होत्या. या मुली बोलण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनाही संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून मज्जाव केला जात होता, असे त्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; मुंबै बँकेची सहकार विभागातर्फे चौकशी

Last Updated : Mar 3, 2021, 2:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.