मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस बिहार पोलिसांची अडवणूक करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुंबई पोलिसांची पाठराखण केली असून मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचा निर्वाळा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. एकीकडे मुंबई महापालिकेने बिहार पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाइन केले असल्याने वाद अधिकच वाढला आहे. मुंबई पोलीस बिहार पोलिसांची अडवणूक करत असल्याचा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला आहे. राष्ट्रीय पातळीवर मुंबई पोलिसांच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यानंतर राज्याच्या गृहमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
-
Mumbai Police investigation is progressing in the right direction, in a professional manner: Maharashtra Home Minister Anil Deshmukh on #SushantSinghRajputCase pic.twitter.com/z66MBnzXgR
— ANI (@ANI) August 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mumbai Police investigation is progressing in the right direction, in a professional manner: Maharashtra Home Minister Anil Deshmukh on #SushantSinghRajputCase pic.twitter.com/z66MBnzXgR
— ANI (@ANI) August 3, 2020Mumbai Police investigation is progressing in the right direction, in a professional manner: Maharashtra Home Minister Anil Deshmukh on #SushantSinghRajputCase pic.twitter.com/z66MBnzXgR
— ANI (@ANI) August 3, 2020
सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी भाजप नेत्यांनीही रान उठवले आहे. मुंबई पोलीस हा तपास करण्यासाठी घाबरत आहेत का? असा सवाल भाजपा नेते किरीट सोमय्या आणि आमदार राम कदम यांनी केला आहे, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. गृहमंत्री देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यास विरोध करून फडणवीस यांची मागणी धुडकावून लावली आहे. एकंदर सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकारण अधिकच वाढत असल्याचे चित्र आहे.
बिहार पोलीस मुंबईत क्वारंटाइन -
अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यूबाबत चौकशी करण्यास आलेले आयपीएएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वारंटाइन केले आहे. या प्रकारावरून राजकारण तापले असताना पालिकेने विनय तिवारी यांना केलेल्या क्वारंटाइनबाबत खुलासा केला आहे. तिवारी यांनी विमान प्रवास केला असल्याने त्यांना नियमानुसार क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांना त्यामधून सूट मिळवण्यासाठी पालिकेच्या सक्षम अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा असे सांगण्यात आल्याची माहिती तिवारी यांना दिली असल्याचे पालिकेने कळविले आहे.