मुंबई - राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत थोड्याच वेळात कायदा-सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात शक्ती नावाच्या कायद्याला मंजुरी देण्यासाठीचा महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयानंतर हा कायदा विधानसभेत संमत करण्यासाठी तो सरकारकडून प्रस्तावित केला जाणार असून या कायद्याला सर्वपक्षीय सदस्य पाठिंबा देतील, असा विश्वास गृहमंत्री आणि देशमुख यांनी व्यक्त केला.
शक्ती कायद्याने महिलांचे प्रश्न सुटतील
मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, शक्ती कायद्याचा विषय बुधवारी (डि. 9 डिसें.) मंत्रिमंडळाच्या बैठकीत असून त्यावर सर्वानुमते निर्णय घेतला जाणार आहे. या मंजुरीनंतर शक्ती कायद्याचा प्रस्ताव विधान मंडळाच्या अधिवेशनात आणला जाईल आणि त्या ठिकाणी हा कायदा संमत केला जाईल. राज्यातील सुरक्षा व्यवस्था आणि महिलांच्या प्रश्न संदर्भात अत्यंत महत्त्वाचा कायदा असल्याने या कायद्याला सर्वच विरोधी पक्षाचे सदस्यही पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर केंद्राकडे कायदा मान्यतेसाठी पाठणार
विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात या कायद्याला मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही रीतसर केंद्र सरकारकडे त्याच्या सीआरपीसी आदीमध्ये काही बदल करण्यासाठी आणि त्याच्या मान्यतेसाठी केंद्राला पाठवणार आहोत, अशी माहितीही देशमुख यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - सदोष 'इलेक्ट्रीक वायरिंग'मुळे मुंबईत आगीच्या घटना, तपासणी करण्याचे अधिकार नसल्याने अग्निशमन दल हतबल
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बोलावली शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक