ETV Bharat / state

शब-ए-बारात संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी - Mumbai breaking news

येणाऱ्या शब-ए-बारातसाठी गृहविभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

Home Department issued guidelines regarding Shab-e-Barat
मंत्रालय
author img

By

Published : Mar 23, 2021, 8:01 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वधर्मीय सण, उत्सवावर निर्बंध आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरामध्ये रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे यंदाचा शब-ए-बारात अत्यंत साधेपणाने साजरा करावी, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तसेच गृह विभागाने यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

शब-ए-बारात निमित्त सर्व मुस्लीम पुरुष आपापल्या विभागातील मशिदीत रात्रभर नमाज, कुरआन व दुआ पठण करतात. त्यामुळे बहुसंख्य मुस्लीम वस्तीत रात्रभर वर्दळ असते. तसेच काही ठिकाणी वाझ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा कोविडचे संकट असल्याने 28 मार्च ते 29 मार्चच्या पहाटेच्या कालावधीत चंद्रदर्शनावर अवलंबून असणाऱ्या शब-ए-बारात या उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे मिरवणुकांचे आयोजन न करता मशिदीत अथवा घरातच नमाज व पठण करावा, असे आवाहन राज्य सरकारने करताना स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून याबाबत जनजागृती करावी, असे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे. तसेच परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे परिपत्रकात म्हटले आहे.

अशा आहेत सूचना

  • शब-ए-बारातनिमित्त स्थानिक मशिदीत नमाज पठणासाठी मुस्लीम पुरुषांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. एका वेळी 40 ते 50 व्यक्तींनी टप्प्या-टप्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन व मास्कचा वापर करून नमाज व दुआ पठण करावे.
  • मशिदीतील व्यवस्थापकांनी मशिद व आजूबाजूच्या परिसरात निर्जंतुकीकरणाची व्यवस्था, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर, इ.) चे पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे.
  • वाझ या कार्यक्रमाचे आयोजन शक्यतो बंदीस्त जागेत करावे. पण, खुल्या जागेत आयोजन केल्यास कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही व त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन होईल याची दक्षता घेण्यात यावी.
  • कोरोनाच्या अनुषंगाने मुंबईत लागू असलेल्या कलम 144 म्हणजेच जमावबंदीच्या आदेशाचे काटेकोर पालन करावे.
  • वाझ कार्यक्रमाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबूक इत्यादी द्वारे उपलब्ध करून द्यावी.
  • कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे पालन करावे.

हेही वाचा - महिला सदस्याला धमकी देणे चुकीचे; चित्रा वाघ यांचा अरविंद सावंतांवर निशाणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.