ETV Bharat / state

मुंबईत होळी आणि धुळवडीचा सण उत्साहात साजरा - धुळवड

मुंबईत आज होळी आणि धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

होळीचा सण साजरा करताना तरुण
author img

By

Published : Mar 21, 2019, 7:36 PM IST

Updated : Mar 21, 2019, 9:00 PM IST

मुंबई - शहराच्या कानाकोपऱ्यात आज मोठ्या उत्साहात होळी आणि धुळवड साजरी करण्यात आली. मुंबईतील होळी ही प्रसिद्ध असून अनेक राजकारणी, सेलिब्रिटी आणि खेळाडू यात सहभागी होतात. त्यामुळे मुंबईच्या होळीकडे अनेकांचे लक्ष असते.

होळीचा सण साजरा करताना तरुण

यंदा महाराष्ट्रात दुष्काळ असल्यामुळे प्रशासनाने कोरडी होळी खेळण्याचे आव्हान नागरिकांना केले होते. त्यामुळे मुंबईकरांनी सोसायट्यांमध्ये आणि रस्त्यांवर पाण्याविना होळी खेळून पाण्याची नासाडी टाळली. दादर परिसरात तर अनेकांनी इको-फ्रेंडली रंगांनी होळी खेळत पाण्याचा अपव्यय टाळला.

होळीच्या सणादिवशी आज ओळखीचे चेहरे रंगांमुळे अनोळखी झाले होते. तसेच अनेक चौका-चौकात होळीवर आधारित जुन्या-नव्या हिंदी आणि मराठी गाण्यांवर लोक नाचत होते. शहरात प्रत्येक सोसायटीत गल्लीबोळात होळीच्या सणाचा मोठा उत्साह होता. यावेळी तरुण-तरुणींनी सुट्टीचा आनंद घेत एकमेकांवर रंग उधळत होळी साजरी केली.

Intro:चैतन्याचा रंगात न्हाऊन निघाली मुंबई

मुंबई

होळीच्या रंगामध्ये संपूर्ण मुंबई न्हाऊन निघाली आहे मुंबई शहराच्या कानाकोपऱ्यात आज मोठ्या उत्साहात धुळवड साजरी केली जाते राजकारणी सेलिब्रिटी खेळाडूंपासून ते सामान्य पर्यंत सगळेच बुरा ना मानो होळी हे म्हणत एकमेकांवर रंग देताना दिसत आहेत

महाराष्ट्रात दुष्काळामुळे कोरडी होळी खेळण्याचे आव्हान आणि लोकांनी केला होता. त्याचा चांगला प्रतिसाद आपणास मुंबईत पाहावयास मिळत आहे .मुंबईतील अनेक सोसायट्यांमध्ये आणि रस्त्यारस्त्यावर पाण्याविना होळी खेळून पाण्याची नासाडी टाळली विशेष म्हणजे काही लोकांनी तर धुळवडीला पाण्याचा अपव्यय केल्यास दंड करण्याचा इशारा दिला होता. त्यांचाही विशेष परिणाम जाणवत आहे .दादरसारख्या परिसरात तर इको-फ्रेंडली रंगानी होळी खेळत पाण्याला फाटा दिला आहे. बच्चे कंपनीच्या हातात पिचकारी तरुणाच्या हातात रंग होते. हे रंग घेऊन एकमेकांना रंगाची आंघोळ घालीत मुंबईकर होळी साजरी करतात होळकर यांच्या जेथे-जेथे नाक्यावर बुरा ना मानो होळी हे मनात सर्वांना रंगविण्यासाठी सज्ज असल्याचे आपल्याला दिसते.

अगदी ओळखीचे चेहरे ही आज रंगांमुळेअनोळखी झाले होते. होळी वर आधारित जुन्या-नव्या हिंदी मराठी गाणी आज शहरात वाजत त्याच्यावर लोक करताना दिसतायेत. शहरात प्रत्येक सोसायटीत गल्लीबोळात होळीच्या सणाचा साऱ्यात मोठ्या उत्साहाने सहभागी झालेत. तरुण-तरुणीही असलेल्या सुट्टीचा आनंद घेत एकमेकांवर रंग उधळत ही होळी साजरी करताना आपणास मुंबई पाहावयास मिळत आहेत.

Body:।

Conclusion:।
Last Updated : Mar 21, 2019, 9:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.