ETV Bharat / state

Hoax Call To Mumbai Police : नेपीयन रोड, कामाठीपुऱ्यात बॉम्ब ठेवल्याचा मुंबई पोलिसांना फोन; तपासात एकाच महिलेनं 38 'फेक कॉल' केल्याचं उघड

Hoax Call To Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील नियंत्रण कक्षाला मंगळवारी सकाळी नेपीयन रोडवर बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती देणारा कॉल आल्यानं खळबळ उडाली. या कॉलचा तपास करत असताना पोलिसांना कामाठीपुऱ्यात बॉम्ब असल्याची माहिती देणारा दुसरा फोन आला.

Hoax Call To Mumbai Police
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 1:49 PM IST

Updated : Sep 5, 2023, 4:20 PM IST

मुंबई Hoax Call To Mumbai Police : शहर पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाला एका महिलेनं नेपीयन रोडवर बॉम्ब असल्याचा कॉल केल्यानं मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर कामाठीपुरा परिसरात बॉम्ब असल्याचा फोन ( Hoax Call To Mumbai Police ) आल्यानं पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील जवानांनी शोध घेतला असता, ही अफवा असल्याचं उघड झालं. मात्र एकाच महिलेनं तब्बल 38 फेक कॉल केल्याचं पोलिसांच्या तपासात पुढं आलं. त्यामुळे पोलिसांचं डोकं चक्रावलं आहे. मात्र या महिलेवर काय कारवाई करण्यात आली, याबाबत अद्याप पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नाही.

नेपीयन रोडवर बॉम्ब असल्याचा फोन : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका महिलेनं मंगळवारी सकाळी फोन करुन नेपीयन रोडवर बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे मुंबई शहर पोलीस दलात एकच धावपळ उडाली. मात्र पोलिसांनी नेपीयन रोडवर शोधमोहीम राबवली असता, तिथं काहीही संशयास्पद आढळून आलं नाही. त्यामुळे मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

  • A woman made a hoax call, saying that a bomb is deployed at Nepean Sea Road. The same woman has called the police 38 times so far to inform them about similar deployment of bombs. Another such call was received during the investigation saying that a bomb is deployed in…

    — ANI (@ANI) September 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संबंधित महिलेला भीती वाटत होती. त्यामुळं बचावासाठी तिनं मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन केला होता. त्यानंतर त्या महिलेच्या शंकेचे निरसन केलं आहे-मुंबई पोलीस दलाच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी

कामाठीपुऱ्यात बॉम्ब असल्याचा पुन्हा फोन : नेपीयन रोडवर बॉम्ब असल्याचा फोन आल्यानं शहर पोलीस दलातील जवानांची चांगलीच धावपळ झाली. मात्र हा फेक कॉल असल्याचं उघड झालं. या फोनची तपासणी करत असताना मुंबई पोलिसांना कामाठीपुऱ्यात बॉम्ब पेरला असल्याची माहिती देण्यात आली. नियंत्रण कक्षाला पुन्हा बॉम्ब असल्याची माहिती देणारा फोन आल्यानं पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. यावेळी महिलेनं कामाठीपुरऱ्यात बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलिसांनी कामाठीपुऱ्यात धाव घेतली. मात्र तिथंही काहीच आढळून आलं नाही. त्यामुळे पोलीस दलातील जवानांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

एकाच महिलेनं केले 38 'फेक कॉल' : मुंबई शहरात एकाच दिवशी दोन बॉम्ब असल्याच्या घटनेंचे कॉल आल्यानं मुंबई पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली. त्यामुळे मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी या फेक कॉल करणाऱ्यांची तपासणी केली. यावेळी मुंबई पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाला एकाच महिलेनं तब्बल 38 वेळा फेक कॉल केल्याचं उघड झालं. त्यामुळे मुंबई पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी चांगलेच चक्रावून गेले आहेत. शहरात बॉम्ब पेरल्याच्या घटनेचे दोन फोन मुंबई पोलीस दलातील नियंत्रण कक्षाला आले, मात्र तिथं काहीही संशयास्पद आढळलं नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. Mumbai Hoax call : चाळीत बॉम्ब ठेवल्याचा कॉल करणारा सापडताच पोलिसही चक्रावले..हट्ट पाहून काढली समजूत

Last Updated : Sep 5, 2023, 4:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.