ETV Bharat / state

हिंगणघाट प्रकरण : उज्वल निकम मांडणार पीडितेची बाजू

author img

By

Published : Feb 7, 2020, 5:23 PM IST

Updated : Feb 7, 2020, 6:11 PM IST

हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा खटला जलदगतीने चालवला जाणार आहे. त्यासाठी हे प्रकरण 'फास्ट ट्रॅक कोर्टा'कडे दिले जाणार आहे. तसेच ज्येष्ठ विधिज्ञ अ‌ॅड. उज्वल निकम हे सरकारच्या वतीने पीडितेची बाजू मांडणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Hinganghat Burnt Case
गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई - हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा खटला जलदगतीने चालवला जाणार आहे. त्यासाठी हे प्रकरण 'फास्ट ट्रॅक कोर्टा'कडे दिले जाणार आहे. तसेच ज्येष्ठ विधिज्ञ अ‌ॅड. उज्वल निकम हे सरकारच्या वतीने पीडितेची बाजू मांडणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाच्या विरोधात राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. पीडित तरुणीच्या प्रकृतीसाठी ठिकठिकाणी प्रार्थना होत असतानाच आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्यासाठी मोर्चे, निदर्शने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज महत्त्वपूर्ण ट्विट केले आहे.

  • The Wardha Hinganghat case will be presented in the fast track court. Mr Ujwal Nikam (Advocate) will be appointed as the Public Prosecutor & all the legal expenses will be borne by the state government.
    Pray for Wardha Hinganghat victim.#justiceforwomen

    — ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हिंगणघाटमधील जळीत प्रकरणाचा खटला लवकरात लवकर निकाली काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे देशमुख म्हणाले. या खटल्यात पीडितेची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जाईल, असेही गृहमंत्री म्हणाले. त्याशिवाय, पीडित तरुणीचा खटल्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार असल्याचे देशमुख म्हणाले.

हिंगणघाट येथे नंदोरी चौकात प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला होता. या घटनेनंत राज्यभर संताप व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी आंदोलने, मोर्चे निघत आहेत. आंदोलक आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी करत आहेत.

Intro:Body:

हिंगणगाट प्रकरण: उज्वल निकम मांडणार पीडितेची बाजू 

मुंबई -  वर्धा हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा खटला जलदगतीने चालवला जाणार आहे. त्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टाकडे दिले जाणार आहे. तसेच ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्वल निकम हे सरकारच्या वतीने पीडितेची बाजू मांडणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. 

हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाच्या विरोधात राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. पीडित तरुणीच्या प्रकृतीसाठी ठिकठिकाणी प्रार्थना होत असतानाच आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्यासाठी मोर्चे, निदर्शने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज महत्त्वपूर्ण ट्विट केले आहे.

हिंगणघाटमधील जळीत प्रकरणाचा खटला लवकरात लवकर निकाली काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे देशमुख म्हणाले. या खटल्यात पीडितेची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जाईल, असेही गृहमंत्री म्हणाले. त्याशिवाय, पीडित तरुणीचा खटल्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार असल्याचे देशमुख म्हमाले.

हिंगणघाट येथे नंदोरी चौकात प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला होता. या घटनेनंत राज्यभर संताप व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी आंदोलने, मोर्चे निघत आहेत. आंदोलक आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी करत आहेत.

Conclusion:
Last Updated : Feb 7, 2020, 6:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.