ETV Bharat / state

रेल्वेमुळे लटकला हिमालय पूल दुर्घटनेचा अहवाल

हिमालय पूल दुर्घटनेबाबत महापालिकेने प्राथमिक अहवाल तयार असून रेल्वे प्रशासनाला याबाबतचा अहवाल सादर करायला सांगितला आहे. हा अहवाल शनिवारी पालिकेला सादर करणे अपेक्षित होते. शनिवारपर्यंत रेल्वेने अहवाल सादर न केल्याने एकत्रित अहवाल पालिका आयुक्तांना सादर करण्यात आलेला नाही. आता पुन्हा एकदा रेल्वेला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. रेल्वेकडून हा अहवाल या आठवड्यात अपेक्षित असून या अहवालानंतर आणखी काही अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

author img

By

Published : Apr 21, 2019, 8:29 PM IST

रेल्वेमुळे लटकला हिमालय पूल दुर्घटनेचा अहवाल

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल महापालिका प्रशासनाने बनवून आयुक्तांना सादर केला. पालिकेच्या या अहवालानुसार सल्लागार आणि अभियंत्यांना दोषी धरण्यात आले. या घटनेचा अंतिम अहवाल २० एप्रिलला सादर केला जाणार होता. मात्र, रेल्वे प्रशासनाने आपला अहवाल अद्याप दिला नसल्याने अंतिम अहवाल अद्याप बनवण्यात आला नसल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.

रेल्वेमुळे हिमालय पूल दुर्घटनेचा अहवाल लटकला

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील टाइम्स ऑफ इंडिया इमारतीजवळील हिमालय पूल १४ मार्चला सायंकाळी कोसळला. यात ३० हून अधिक लोक जखमी होऊन ७ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मुंबईमधील पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. या दुर्घटनेची जबाबदारी पालिका आणि रेल्वे प्रशासनाने एकमेकांवर ढकलली होती. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिका आयुक्तांनी चौकशी समिती नेमून सल्लागार आणि अभियंत्यांना दोषी ठरवण्यात आले. याप्रकरणी सल्लागार आणि दोन अभियंते सध्या पोलीस कोठडीत आहेत.

या दुर्घटनेबाबत महापालिकेने प्राथमिक अहवाल तयार असून रेल्वे प्रशासनाला याबाबतचा अहवाल सादर करायला सांगितला आहे. हा अहवाल शनिवारी पालिकेला सादर करणे अपेक्षित होते. शनिवारपर्यंत रेल्वेने अहवाल सादर न केल्याने एकत्रित अहवाल पालिका आयुक्तांना सादर करण्यात आलेला नाही. आता पुन्हा एकदा रेल्वेला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. रेल्वेकडून हा अहवाल या आठवड्यात अपेक्षित असून या अहवालानंतर आणखी काही अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कसा केला जात आहे अहवाल -

१४ मार्चला सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने ७ जणांना जीव गमवावा लागला. तर ३० जण जखमी झाले. या दुर्घटनेची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दक्षता विभागाला दिले होते. तांत्रिक सल्लागाराची झालेली नियुक्ती, हिमालय पुलाबाबत त्यांनी पूल विभागाला सादर केलेला अहवाल, पूल विभागातील अभियंत्यांनी अहवालाची दखल घेतली की नाही, दरम्यानच्या काळात ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी हिमालय पुलाचे करण्यात आलेले सुशोभीकरण आदींचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात येत आहे.

Intro: मुंबई -
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल महापालिका प्रशासनाने बनवून आयुक्तांना सादर करण्यात आला. पालिकेच्या या अहवालानुसार सल्लागार आणि अभियंत्यांना दोषी धरण्यात आले. या घटनेचा अंतिम अहवाल २० एप्रिलला सादर केला जाणार होता. मात्र रेल्वे प्रशासनाने आपला अहवाल अद्याप दिला नसल्याने अंतिम अहवाल अद्याप बनवण्यात आला नसल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली. Body:छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील टाइम्स ऑफ इंडिया इमारतीजवळील हिमालय पूल १४ मार्चला सायंकाळी कोसळला. यात तीसहून अधिक लोक जखमी होऊन सात जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर मुंबईमधील पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. या दुर्घटनेचॆ जबाबदारी पालिका आणि रेल्वे दोन्ही प्रशासनाने एकमेकांवर ढकलली होती. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिका आयुक्तांनी चौकशी समिती नेमून सल्लागार आणि अभियंत्यांना दोषी ठरवण्यात आले. याप्रकरणी सल्लागार आणि दोन अभियंते सध्या पोलीस कोठडीत आहेत.

या दुर्घटनेबाबत महापालिकेने प्राथमिक अहवाल तयार केला आहे. पालिकेने रेल्वे प्रशासनाला याबाबतचा अहवाल सादर करायला सांगितला आहे. हा अहवाल शनिवारी पालिकेला सादर करणे अपेक्षित होते. शनिवारपर्यंत रेल्वेने अहवाल सादर ना केल्याने एकत्रित अहवाल पालिका आयुक्तांना सादर करण्यात आलेला नाही. आता पुन्हा एकदा रेल्वेला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. रेल्वेकडून हा अहवाल या आठवड्यात अपेक्षित असून या अहवालानंतर आणखी काही अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कसा केला जातोय अहवाल -
१४ मार्चला सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने सात जणांना जीव गमवावा लागला, तर ३० जण जखमी झाले. या दुर्घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दक्षता विभागाला दिले होते. तांत्रिक सल्लागाराची झालेली नियुक्ती, हिमालय पुलाबाबत त्याने पूल विभागाला सादर केलेला अहवाल, पूल विभागातील अभियंत्यांनी अहवालाची दखल घेतली की नाही, दरम्यानच्या काळात ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी हिमालय पुलाचे करण्यात आलेले सुशोभीकरण आदींचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात येत आहे.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.