ETV Bharat / state

Dowry Crime : हुंड्याच्या गुन्ह्यात उच्चशिक्षितांचा सहभाग सर्वाधिक; 4 महिन्यांत 218 गुन्हे - Dowry Crime

ग्रामीण भागाप्रमाणे मुंबईतही विवाहित महिलांभोवती हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या चार महिन्यांत २१८ गुन्हे दाखल झाले असून १० जणींचा बळी गेला आहे. या हुंड्याच्या गुन्ह्यात उच्चशिक्षितांचा सहभाग सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Dowry Crime
हुंड्याचा गुन्हा
author img

By

Published : Jun 4, 2023, 7:13 PM IST

हुंड्यांच्या स्वरूपाविषयी माहिती देताना सामाजिक कार्यकर्त्या

मुंबई: मुंबईसारख्या शहरात गेल्या चार महिन्यांत मुंबई पोलिसांकडे हुंड्या संदर्भातील २१८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी ८६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. दिवसाला एक ते दोन महिला हुंड्यासह कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत चार महिन्यांतील आकडेवारी कमी असली तरी अत्याचाराच्या प्रकाराला पूर्णपणे रोख लागलेला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, हुंड्यासाठी छळ करणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षितांचे प्रमाण जास्त आहे.

महिलां संबंधित गुन्ह्यांची आकडेवारी: मुंबई पोलीसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या चार महिन्यात मुंबईत महिलां संबंधित १ हजार १९७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी १ हजार ४७० गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. यामध्ये ३२५ महिला विकृत लैंगिक अत्याचाराच्या शिकार ठरल्या आहेत. तसेच ४०७ जणींच्या अपहरणाची नोंद झाली आहे.

महिलेचा हुंडाबळी: कांदिवलीत राहणाऱ्या ममता अशोककुमार चौरसिया या महिलेचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. २०१९ मध्ये ममता यांचा विवाह झाला. विवाहाच्या काही दिवसानंतर हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी छळ सुरू केला. वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ केली. १५ फेब्रुवारीला ममताचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ उडली. ममताचा भाऊ जितेंद्र सीयाराम चौरसिया (३६) यांच्या तक्रारीवरून कांदिवली पोलिसांनी गुन्हा नोंदवत पतीसह सासऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.

समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न: दोन कुटुंबातील वाद पोलिसांपर्यंत आल्यानंतर थेट कारवाई करण्याऐवजी महिला अधिकारी आणि कर्मचारी सुरुवातीला त्यांचे समुपदेशन करतात. महिला पोलीस कक्षाकडून अनेक प्रकरणात समझोता घडवून संसार जोडण्याचे काम केले जाते. यासाठी पोलीस उपायुक्त, महिला अत्याचार प्रतिबंधक शाखा परिश्रम घेतात.

महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेचे काम: महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेचे प्रभारी यांच्या अंतर्गत कक्ष १, कक्ष २ आणि महिला सहाय्य कक्ष यांचा समावेश असतो. हा कक्ष हुंडाबळी, हुंड्याच्या संबंधित आत्महत्या आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत उद्‌भवणारे इतर गुन्हे, भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ (अ) अंतर्गतचे गुन्हे तसेच कौटुंबिक हिंसाचार व हुंड्याशी निगडित इतर गुन्ह्याचा तपास करतो. तसेच याबाबत प्राप्त तक्रार अर्जाची चौकशी करून मार्गी काढण्याचे कामसुद्धा करतो.

२९५ गुन्हे दाखल: हुंड्याव्यतिरिक्त होत असलेल्या छळप्रकरणी ६८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हुंड्यासाठी चौघींचा बळी घेण्यात आला, तर ६ जणींनी आयुष्य संपविले. गेल्या वर्षी याच चार महिन्यांत २९५ गुन्हे दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा:

  1. Pune Crime : मुजोर रिक्षा चालकाने कहरच केला; प्रवाशाचा तोडला चक्क कान
  2. Akshay Bhalerao Murder Case: अक्षय भालेराव खून प्रकरणात ॲट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल; सात आरोपींना पोलीस कोठडी; फरार आरोपींचा शोध सुरू
  3. Children Trafficking Case Nashik: 'त्या' 60 मुलांची तस्करी नाहीच! लोहमार्ग पोलीस व 'आरपीएफ'चा उताविळपणा

Dowry Crime : हुंड्याच्या गुन्ह्यात उच्चशिक्षितांचा सहभाग सर्वाधिक; 4 महिन्यांत 218 गुन्हे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.