मुंबई - हंस रिसर्च ग्रुपने शहर पोलीस गुन्हे शाखेकडून टीआरपी घोटाळ्याची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) हस्तांतरित करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पोलीस मानसिक विनाकारण त्रास देत असल्याची तक्रार हंस रिसर्च ग्रुपने केली होती. पोलिसांनी संस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱयांना दररोज चौकशीसाठी बोलवून त्रास देऊ नये. एक दिवस ठरवून सर्वांची चौकशी करावी, अशी सूचना उच्च न्यायालयाने केली आहे. मुंबई पोलिसांच्या बाजूने देवदत्त कामत युक्तिवाद करत आहेत.
मुंबईच्या गुन्हे शाखेकडून दबाव येत असल्याचा आरोप -
रिपब्लिक टीव्हीने अंतर्गत अहवालाच्या प्रतीसाठी हंसला कधीही अर्ज केला नाही. हंसने दाखल केलेल्या याचिकेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि एसीपी शशांक सांभल्लर यांची नावे देण्यात आली आहेत. हंस रिसर्चच्या कर्मचार्यांना वारंवार गुन्हे शाखा कार्यालयात वारंवार बोलवण्यात येते. 12 ऑक्टोबरपासून चौकशी करत असल्याचा आरोप गुन्हे शाखेवर करण्यात आला आहे.
टीआरपी घोटाळा आणि हंस रिसर्च 'कनेक्शन' -
रिपब्लिक टीव्हीने सादर केलेला हंसबद्दलचा अहवाल बनावट असल्याचे संस्थेचे नाकारले होते. यामुळे गुन्हे शाखेचे अधिकारी छळ करत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. टीआरपी घोटाळ्यातील एफआयआरमध्ये हंसचा माजी कर्मचारी विशाल वेदप्रकाश भंडारी यांचे नाव होते. याविरोधात हंसने एफआयआर दाखल केला होता. टीआरपीला चालना देण्यासाठी भंडारी यांनी काही टीव्ही चॅनेल पाहण्यासाठी काही घरे प्रभावित केल्याची कबुली दिली होती. मुंबई उच्च न्यायालयासमोर केलेल्या याचिकेमध्ये हंस रिसर्चने आता ही बाब निदर्शनास आणली आहे.