मुंबई - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात सुरू असलेल्या तपासाबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा नाराजी व्यक्त करत एसआयटी आणि सीबीआयवर ताशेरे ओढले आहे.
या प्रकरणी तपास करत असलेल्या एसआयटी (विशेष तापास पथक) कडून होत असलेल्या तपासामध्ये कुठलीही प्रगती होत नसून, इतर तपास यंत्रणांनी केलेल्या तपासावर अवलंबून राहू नका, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने एसआयटीवर ताशेरे ओढले आहेत.
हेही वाचा - कलम ३७० प्रमाणेच मोदी सरकारने राममंदिर निर्मितीचाही निर्णय घ्यावा - उद्धव ठाकरे
आज झालेल्या सुनावणीमध्ये तपास कामासाठी चार आठवड्यांचा वेळ द्यावा, अशी मागणी सीबीआय तसेच कोल्हापूर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने केलेली आहे. मुंबईसह राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे तपास कामात अडथळा येत असल्याचे कारण आज सीबीआय, एसआयटीने दिल्यामुळे यावर तीव्र नाराजी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे. या संदर्भातील सुनावणी चार आठवड्यानंतर होणार आहे.
हेही वाचा - 'स्वतःची कातडी वाचवण्यासाठी त्यांनी पक्षबद्दल केले'