मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक हनी बाबू यांनी अंतरिम वैद्यकीय जामीनासाठी उच्च न्यायालयात याचिका धाव घेतली ( Bhima Koregaon case accused Honey Babu ) होती. मोतीबिंदूची शस्त्रक्रियेसह पोटाचे विकार आणि हाडांशी संबंधित आजारावर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल किंवा सैफी हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले जाऊ शकते का यावर एनआयएला उद्या होणाऱ्या सुनावणी दरम्यान सांगण्याचे निर्देश न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने दिले आहे. आज 14 डिसेंबर रोजी या याचिकेवर पुन्हा सुनवणी होणार ( Hearing on Honey Babu surgery ) आहे.
हनी बाबू यांना आजारांनी ग्रासले : आरोग्यशी संबंधित समस्यांवर उपचार घेण्यासाठी खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगीसाठी कारागृह अधिक्षक आणि विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र काहीही प्रतिसाद मिळाला नाही. मोतीबिंदूमुळे दृष्टी गमावत असून आपल्याला पोटदुखी आणि गुडघे दुखीचाही त्रास होत ( Honey Babu Suffered From Diseases ) आहे. गुडघ्यातून होणाऱ्या वेदना असह्य आहेत. त्यामुळे दैनंदिन कामे करण्यासही अडचणींचा सामाना करावा लागत आहे. या तिन्ही समस्यांसंदर्भात तातडीने चाचणी करण्यासाठी आणि उपचार सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी बाबू यांनी याचिकेतून केली आहे.
हनी बाबू यांच्या शस्त्रक्रियेवर सुनावणी : वैद्यकीय चाचणीसाठी बाबू यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश कारागृह प्रशासनाला देण्यात यावेत अशी मागणी त्यांच्यावतीने वकील युग चौधरी यांनी न्यायालयाकडे केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे वकील संदेश पाटील यांनी वैद्यकीय चाचणीच्यावेळी बाबू यांच्या नातेवाईकांनी उपस्थित असण्यावर आक्षेप घेतला. त्यावर बाबू यांचे वैद्यकीय अहवाल पाहण्याचे आदेश न्यायालयाने एनआयएला देत याचिकेवरील सुनावणी आज 14 डिसेंबर रोजी निश्चित केली आहे.
काय आहे प्रकरण : पेशव्यांचे मराठा सैन्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या 200 व्या स्मृतिदिनानिमित्त 31 डिसेंबर 2017 रोजी भीमा कोरेगांव शौर्य दिवस प्रेरणा अभियान या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दलित संघटनांनी एकत्रितपणे एका रॅलीचे आयोजन केले होते. या युद्धात पेशव्यांविरोधात ईस्ट इंडिया कंपनीबरोबर महार रेजिमेंट लढली होती आणि यात बहुतांश दलित सैनिक होते.
भीमा कोरेगाव हिंसाचार : पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी दंगल झाली होती आणि त्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा ( Bhima Koregaon Violence ) होतो. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. या हिंसाचाराला एक दिवस अगोदर म्हणजे 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदे तील वक्तव्यं कारणीभूत होती अशा तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला. या एल्गार परिषदे मागे माओवादी संघटनांचा हात होता असं म्हणत या संघटनांशी कथित संबंध आहेत या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक केली.