मुंबई - महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदावरून सुबोध कुमार जैसवाल यांना केंद्रात प्रतिनियुक्ती मिळाल्यानंतर आयपीएस हेमंत नगराळे यांच्याकडे महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. ते 1987 च्या बॅचचे आयपीएस आहे. सध्या त्यांच्याकडे तांत्रिक व कायदेशिर विभागाचा महासंचालक पदाचा कार्यभार असून पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार हेमंत नगराळे यांना देण्यात आलेला आहे.
नगराळेंकडे अतिरिक्त भार
सुबोध कुमार जैसवाल यांना दिल्लीत सीआयएसएफच्या महासंचालकपदी पाठवण्यात आल्यामुळे महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदी कोणाची वर्णी लागणार हे अद्याप स्पष्ट झाले नव्हते. मात्र हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सुद्धा गृह खात्यामध्ये सुरू होती. आता त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुबोध जयस्वाल होते नाराज?
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल हे नाराज असल्याची चर्चा गृह खात्यामध्ये केली जात होती. यामुळे त्यांनी केंद्रात परत जाण्यासाठी राज्य सरकारला विनंती केली होती, असेही सांगण्यात येत होते. सप्टेंबर 2020मध्ये राज्यातील पन्नास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या मात्र या बदलांच्या कामात सुबोध जयस्वाल यांचा सल्ला किंवा मत विचारात घेतले गेले नव्हते म्हणून सुबोध जयस्वाल हे नाराज असल्याचेही सांगितले जात आहे.
हेही वाचा - सरकारी कामकाजात संभाजीनगर हा उल्लेख काँग्रेसला अमान्य; थोरातांनी पुन्हा ठणकावले