ETV Bharat / state

मुंबईत पावसाचा जोर कायम राहणार - मुंबई पाऊस बातमी

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई व आसपासच्या भागात मुसळआर पाऊस सुरू आहे. दादर, सायन, भांडुप, घाटकोपर, मुलुंड, विक्रोळी येथील भागात पावसाचा जोर अधून-मधून कायम आहे. यामुळे सखल भागात पाणी शिरले आहे.

पावसाचे दृश्य
पावसाचे दृश्य
author img

By

Published : Jul 5, 2020, 6:28 PM IST

मुंबई - शनिवारी (दि. 4 जुलै) मध्यरात्रीपासून पावसाचा जोर मुंबईत वाढला आहे. मुसळधार पावसामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनेक ‍ठिकाणी सखोल भागात पाणी साचले आहे. दादर, सायन, भांडुप, घाटकोपर, मुलुंड, विक्रोळी येथील भागात पावसाचा जोर अधून-मधून कायम आहे.

शुक्रवारी (दि. 3 जुलै) मुंबईसाठी दिलेला रेड अलर्ट आज देखील कायम ठेवण्यात आला आहे. हवामान खात्याने पावसाबाबत दिलेला अंदाज अजूक ठरला आहे. पावसाचा जोर कायम असेल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 200 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पूर्व उपनगरात भांडूप एलबीएस मार्ग, व्हिलेज रोड येथे पाणी भरले आहे. काही ठिकाणी इमारतींच्या प्रवेशद्वारातच पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवेश करण्यासाठी रहिवाशांना कसरत करावी लागत आहे. अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

पावसाचे दृश्य

गुजरातमध्ये तीव्र पावसाचा इशारा

गुजरातमध्ये 1-2 दिवस अतीमुसळधार पाऊस पडेल. त्यानुसार सौराष्ट्र आणि कच्छच्या भागात तीव्र पावसाची शक्यता आहे.

  • पाऊस नोंद आणि तापमान (मि.मी.मध्ये)
    मुंबई (सांताक्रूझ) - 200.8 (मागील 24 तास)
    मुंबई (कुलाबा) - 129.6 (मागील 24 तास)
    गोवा (पणजी) - 49. 1 (मागील 24 तास)
  • 1जून पासून झालेला पाऊस (मि.मी.मध्ये)

मुंबई (सांताक्रूझ) - 780.1
मुंबई (कुलाबा) - 915. 6
गोवा(पणजी) - 1368. 9

  • तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
    मुंबई (सांताक्रूझ) - 27.3 (कमाल), 24.8 (किमान)
    मुंबई (कुलाबा) : 27.0 (कमाल), 24.5 (किमान)
    गोवा(पणजी) : 27. 6 (कमाल), 24.2 (किमान)

हेही वाचा - वांद्रेतील एका इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला, जीवितहानी नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.