ETV Bharat / state

मुंबईत पावसाची दमदार हजेरी, सखल भागात साचले पाणी - मुंबई पाऊस बातमी

निसर्ग चक्रीवादळ बुधवारी दुपारच्या सुमारास अलिबागजवळील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर धडकले. या वादळामुळे बुधवारी सकाळपासूनच मुंबईत पाऊस कोसळत होता. दुपारी तर काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तसेच वादळामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. काही तासानंतर चक्रीवादळाची दिशा बदलली. त्यामुळे मुंबईवरील धोका टळला.

mumbai rain news  mumbai latest news  post nisarga cyclone effect on mumbai  मुंबई लेटेस्ट न्युज  निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईवर परिणाम  मुंबई पाऊस बातमी  पावसाचा मुंबईवर परिणाम
मुंबईत पावसाची दमदार हजेरी, सखल भागात साचले पाणी
author img

By

Published : Jun 4, 2020, 12:19 PM IST

मुंबई - आज गुरुवारी सकाळपासून मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळला असला तरी मुंबईमध्ये रेड अलर्ट अजूनही कायम आहे. त्यामुळे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. किंग्स सर्कल या सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे. मात्र, याचा वाहतुकीवर कुठलाही परिणाम झालेला नाही.

मुंबईत पावसाची दमदार हजेरी, सखल भागात साचले पाणी

निसर्ग चक्रीवादळ बुधवारी दुपारच्या सुमारास अलिबागजवळील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर धडकले. या वादळामुळे बुधवारी सकाळपासूनच मुंबईत पाऊस कोसळत होता. दुपारी तर काही भागात मुसळधार पाऊस बरसला. तसेच वादळामुळे झाडांची देखील पडझड झाली. काही तासानंतर वादळाची दिशा बदलली. त्यामुळे मुंबईवरील धोका टळला. मात्र, त्यानंतर मुंबई, उपनगर आणि परिसरातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार आज सकाळपासूनच मुंबईत दमदार पावसाने हजेरी लावली.

या पावसामुळे सखल भागात गुडघाभर पाणी साचले असून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या पाण्याचा निचरा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. काही ठिकाणी वाहने बंद पडल्यानं त्यांना वाहतूक पोलिसांच्या मदतीने रस्त्याच्या कडेला हटविण्याचे काम सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.