ETV Bharat / state

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देशात जोरदार पाऊस; शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी ओढे आणि नाल्यांना पूर आल्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. जायकवाडी, बिंदूसरा, विष्णूपुरी धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.

rain update in maharashtra
राज्यात जोरदार पाऊस
author img

By

Published : Sep 19, 2020, 1:47 PM IST

Updated : Sep 19, 2020, 8:06 PM IST

मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, बीड आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर यासह खान्देशातील नंदूरबार आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. गोदावरी नदीवरील जायकवाडी, बीडमधील बिंदुसरा आणि नंदुरबार जिल्ह्यात तापी नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. विविध तालुक्यांत ओढ्या-नाल्यांना पूर आल्याने पूल पाण्याखाली जाऊन रस्ते बंद झाले आहेत. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असताना पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन, मूग पिकांचे नुकसान झाले आहे.

राज्यात जोरदार पावसाचा पिकांना फटका

लातूर : औसा तालुक्यात मुसळधार पाऊस ; उंबडगा येथील पूल पाण्याखाली

औसा तालुक्यात शुक्रवारी रात्री उशिरा मुसळधार पाऊस झाला. औसा- उंबडगा मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाचा कहर सुरू आहे. उदगीर, निलंगा, लातूर ग्रामीण तसेच औसा तालुक्यातील काही मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे खरिपातील सोयाबीन पिकाला पावसाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नांदेड : जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती, 'विष्णूपुरी'चे सहा दरवाजे उघडले

नांदेड जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मुदखेड तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे सीतानदीला पूर आला आहे. त्यामुळे नांदेड ते मुदखेड हा रस्ता बंद करण्यात आला. मुदखेड ते भोकर, मुदखेड ते बारड हे रस्ते सुद्धा बंद झाले आहेत. विष्णूपुरी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सीतानदीला आलेल्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील जायकवाडी, यलदरी, इसापूर, विष्णूपुरी व माजलगाव येथील धरणे भरली आहेत. अनेक नदी-नाले तुडूंब भरून वाहात आहेत.

परभणी : 'गोदावरी'ला पूर! परभणीच्या 5 तालुक्यांतील शेकडो गावांना सतर्कतेचा इशारा

परभणी जिल्ह्यातील 5 तालुक्यांतून गोदावरी नदी वाहते. जायकवाडी आणि माजलगाव प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग होत असल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या शेकडो गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होऊन कुठल्याही क्षणी पूर परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा आणि पालमच्या तहसील प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन केले आहे.

बीड : गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; बिंदुसरा ही ओव्हरफ्लो

जायकवाडी धरणाचे पाणी सोडल्यामुळे तसेच गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बीड जिल्ह्यामधील माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली गावच्या परिसरातील काही छोट्या गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत समाधानकारक पाऊस पडला असून बीड तालुक्यातील बिंदूसरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील करंजखेड़, चिंचोली, घाटशेन्द्रा भागात मुसळधार पाऊस

कन्नड तालुक्यात घाटशेन्द्रा, चिंचोली, करजखेड भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतामध्ये पाणी शिरले. तालुक्यात सरासरी 749 मिलीमीटर पाऊस होतो; यावेळी 900 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन प्रशासनाने मदत मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हिंगोली : कुरुंदा गावात शिरले पुराचे पाणी; तीन वर्षांतील दुसरी घटना

वसमत तालुक्यातील कुरुंदा या गावात जलेश्वर नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर, घरातील संसारोपयोगी साहित्य, कपडेलत्ते देखील पाण्यामध्ये वाहून गेले. तीन वर्षानंतर दुसऱ्यांदा ही घटना घडली आहे. अगोदरच्या पुरातून अजूनही अनेक कुटुंब सावरलेले नाहीत. गुरुवारी रात्री या भागात ढगफुटी प्रमाणे झालेल्या पावसामुळे जलेश्वर नदीला पूर आला.

सोलापूर : जिल्ह्यात पावसाचे धुमशान; 172 मिमी पावासाची नोंद

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 172 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस शनिवारी पहाटेपर्यंत कोसळत होता. पावसामुळे पंढरपूर ते सातारा, पुणे ते पंढरपूर या मार्गांवरील वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे वाहनाच्या रांगचरांगा लागल्या आहेत. अनेक भागांतील ओढे व नाल्यांना पूर आला होता. पंढरपूर, माळशिरस तालुक्यात ओढ्यांना पूर आला तर, ऊस, द्राक्ष, ज्वारी, कांदा, पिकाचे नुकसान झाले आहे. करकंब 9 मिमी, पट कुरोली 49 मिमी, भंडीशेगाव 9 मिमी, भाळवणी 62मिमी, कासेगाव 12 मिमी, पंढरपूर 7 मिमी, तुंगत 1 मिमी, चळे 14 मिमी, पुळुज 9 मिमी एकूण पाऊस 172 मिमी नोंद तर सरासरी पाऊस 19.11 मिमी पावासाची पडला आहे.

सांगली : दुष्काळी आटपाडी तालुक्यात पाऊसाचा कहर; भिंत कोसळून सख्ख्या बहिणी ठार

सांगलीच्या दुष्काळी आटपाडी तालुक्यात पावसाचा कहर सुरू आहे. दोन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. तर, माणगंगा नदीला पूर आला आहे. पावसामुळे आटपाडीमधील एका घराची भिंत कोसळून दोन चिमुरड्या सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आटपाडी शहरातल्या शुक ओढ्यालाही पूर आल्यामुळे तेथील पूल पाण्याखाली गेला आहे. त्याबरोबर ओढ्याच्या शेजारी असणाऱ्या आटपाडी ग्रामपंचायतजवळच्या सुमारे 40हून अधिक दुकानांमध्ये ओढ्याच्या पुराचे पाणी शिरले आहे.

वाशिम : मालेगाव तालुक्यात शेतीचे प्रचंड नुकसान

मालेगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पांघरी नवघरे, या गावातील उडीद, मूग पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. पावसाचा मुगाच्या शेतीला मोठा फटका बसला आहे आहे. या महिना अखेर मुगाचे बहुतांश पीक काढणीसाठी तयार होणार होते. त्यामुळे कृषी विभागाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

नंदूरबार : तापी नदीकाठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

जिल्ह्यातील सारंगखेडा बॅरेजचे चार दरवाजे तर, प्रकाशा बॅरेजचे पाच दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे 22 दरवाजे सायंकाळी उघडले असून 56 हजार 229 क्युसेक इतका पाणी विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सायंकाळी सारंगखेडा बॅरेजचे 4 दरवाजेे 2 मीटर क्षमतेने उघडण्यात आले असून 31 हजार 327 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पुढील 72 तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असून तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

हेही वाचा-हृदयद्रावक..! आठ महिन्याचे बाळ झाले पोरके, वीज पडल्याने आई-वडिलांचा जागीच मृत्यू

Last Updated : Sep 19, 2020, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.