ETV Bharat / state

मूसळधार पावसाने नवी मुंबईकरांची दैना; ऐरोलीत साचलेल्या पाण्यात अडकल्या गाड्या - heavy rain mumbai

शहरातील महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. अनेक कार पाण्याखाली गेल्या आहेत. ऐरोलीत रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून अनेक दुचाकी चालक मोठ्या शर्तीने  पाण्याबाहेर जाण्याचा प्रयत्न  करत आहेत. काल मंगळवारी सकाळपासून पडत असलेला पाऊस अजूनही सुरुच आहे. नवी मुंबई, पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे आणि सायन-पनवेल महामार्गावरही पावसाचे पाणी साचले आहे.

पावसाने नवी मुंबईकरांची दैना
author img

By

Published : Sep 4, 2019, 5:24 PM IST

मुंबई -धुवांधार सुरू असलेल्या पावसाने नवी मुंबईकरांची दैना उडवली आहे. येथील अनेक रस्त्यावर पाणीच-पाणी झाले आहे. जवळ-जवळ गुडघाभर पाणी रस्त्यावर भरले आहे. त्यामुळे अनेक रस्त्यावर वाहने अडकली आहेत. ऐरोलीमध्ये पुलाखाली रस्त्यावरुन नदी वाहत असल्याचे चित्र तयार झाले आहे.

हेही वाचा-पावसामुळे सायन-पनवेल रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

येथील महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. अनेक कार पाण्याखाली गेल्या आहेत. ऐरोलीत रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून अनेक दुचाकी चालक मोठ्या शर्तीने पाण्याबाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मंगळवार सकाळपासून पडत असलेला पाऊस अजूनही सुरुच आहे. नवी मुंबई, पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे आणि सायन-पनवेल महामार्गावरही पावसाचे पाणी साचले आहे. गावठाण भागातील बैठ्या चाळींमध्ये घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेकांच्या घरातील सामानांची नासधूस झाली आहे. ऐरोली टी जंक्शन, भुयारी मार्ग ऐरोली अंडरपासमध्ये देखील पाणी साचले आहे. कोपरखैरणे, महापे, वाशी, तुर्भे एपीएमसी पोलीस ठाणे आणि लगत परिसरात पाणी साचले आहे.

Intro:सोबत एडिटेड पॅकेज जोडला आहे

नवी मुंबई

धुवांधार सुरू असलेल्या पावसाने नवी मुंबईकरांची दैना उडवली आहे. नवी मुंबईच्या अनेक रस्त्यावर पाणीच पाणी झालंय. जवळ जवळ गुडघाभर पाणी भरल्यामुळे अनेक रस्त्यावर वाहने अडकली आहेत. ही दृश्य आहेत नवी मुंबईतल्या ऐरोलीमधली...ऐरोलीमध्ये पुलाखाली रस्त्यावरून नदी वाहते की काय असं भासवणारं हे चित्र...
Body:महामार्गावर वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत...तर दुसरीकडे अनेक कार पाण्याखाली गेल्याचं आपण पाहतोय...ऐरोलीत रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून अनेक दुचाकी चालक कशी बशी वाट काढत पाण्याबाहेर जाण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत...काल सकाळपासून बरसत असलेला पाऊस अजूनही सुरुच आहे. नवी मुंबई, पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे आणि सायन-पनवेल महामार्गावरही पावसाचं पाणी साचलं आहे.गावठाण भागातील बैठ्या चाळींमध्ये घरातही पाणी शिरले. त्यामुळे अनेकांच्या घरातील सामानांची नासधूस झाली. ऐरोली टी जंक्शन, भुयारी मार्ग ऐरोली अंडरपासमध्ये देखील पाणी साचले आहे. कोपरखैरणे, महापे, वाशी , तुर्भे एपीएमसी पोलिस ठाणे आणि लगत परिसरात पाणी साचले आहे.

Conclusion:मुसळधार पावसामुळे कोपरखैरणे, नेरूळ, कळंबोली येथील हायवेला असणाऱ्या सबवेमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांना त्यातून वाट काढत जावी लागत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.