मुंबई - शहरासह उपनगरात मंगळवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. सायन भागाताली गांधी मार्केट आणि सायन रेल्वे स्थानकाजवळील रुळांवर पाणी साचले आहे. यामुळे लोकल सेवा प्रभावित झाली आहे. मध्य रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे.
-
Mumbai: Railway tracks submerge at Sion railway station, following heavy rainfall in the city. #MumbaiRains pic.twitter.com/cl4E0dgWf7
— ANI (@ANI) July 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mumbai: Railway tracks submerge at Sion railway station, following heavy rainfall in the city. #MumbaiRains pic.twitter.com/cl4E0dgWf7
— ANI (@ANI) July 24, 2019Mumbai: Railway tracks submerge at Sion railway station, following heavy rainfall in the city. #MumbaiRains pic.twitter.com/cl4E0dgWf7
— ANI (@ANI) July 24, 2019
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार -
सकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा १७१.८ मिलिमीटर तर सांताक्रूझ येथे ५८.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
-
Maharashtra: Water logging in parts of Mumbai following rainfall; visuals from Gandhi Market in Sion. pic.twitter.com/ytfG043xIt
— ANI (@ANI) July 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra: Water logging in parts of Mumbai following rainfall; visuals from Gandhi Market in Sion. pic.twitter.com/ytfG043xIt
— ANI (@ANI) July 24, 2019Maharashtra: Water logging in parts of Mumbai following rainfall; visuals from Gandhi Market in Sion. pic.twitter.com/ytfG043xIt
— ANI (@ANI) July 24, 2019
मुंबई महापालिका व आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार- (रात्री १२ ते सकाळी ७ वाजेपर्यंत)
शहर विभागात - कुलाबा येथे १६६ मिलिमीटर, मलबार हिल येथे १६४ मिलिमीटर, डी वॉर्ड येथे १६२ मिलिमीटर, आय हॉस्पिटल येथे १५८ मिलिमीटर, सी वॉर्ड येथे १५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
पूर्व उपनगरात - चेंबूर अग्निशमन केंद्र येथे १०२ मिलिमीटर, कुर्ला एल. वॉर्ड येथे ९२ मिलिमीटर, एम. वेस्ट येथे ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
पश्चिम उपनगरात* - वांद्रे येथे 134 मिलिमीटर, सांताक्रूझ एच वेस्ट येथे 121 मिलिमीटर, विलेपार्ले येथे 102 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
-
#MumbaiRains: Roads in Sion area water-logged, after heavy rainfall in the city. #Maharashtra pic.twitter.com/iM9lOsOIk4
— ANI (@ANI) July 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#MumbaiRains: Roads in Sion area water-logged, after heavy rainfall in the city. #Maharashtra pic.twitter.com/iM9lOsOIk4
— ANI (@ANI) July 24, 2019#MumbaiRains: Roads in Sion area water-logged, after heavy rainfall in the city. #Maharashtra pic.twitter.com/iM9lOsOIk4
— ANI (@ANI) July 24, 2019
बेस्ट बसचे मार्ग वळवले -
- हिंदमाता येथील वाहतूक हिंदमाता पुलावरून वळवण्यात आली आहे
- सायन रोड नंबर २४ येथील वाहतूक रोड नंबर ३ वरून वळवली
- माटुंगा गांधी मार्केट येथील वाहतूक भाऊ दाजी लाड मार्गावरून वळवली
- अलंकार टॉकीज ते भेंडी बाजार येथील वाहतूक दोन टांकी ते जे. जे हॉस्पिटल या मार्गाने वळवली
- प्रतीक्षानगर येथील वाहतूक जयशंकर यागणिक मार्गाने वळवली
- गोरेगाव सिद्धार्थ नगर हॉस्पिटल येथील वाहतूक गजानन महाराज चौक या मार्गाने वळवली
- वांद्रे एस. व्ही. रोड नॅशनल कॉलेज येथील वाहतूक लिंक रोडवरून वळवली
शहराच्या हिंदमाता परिसरामध्येही पाणी साचले आहे. शहरासह उपनगरात रात्रीपासूनच पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली, त्यामुळे अनेक भांगामध्ये रस्त्यावर पाणी साचले आहे. परिणामी नागरिकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.