ETV Bharat / state

कथित ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही - राजेश टोपे - राजेश टोपेंची व्हायरल ऑडिओ क्लिप

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या नावाखाली सध्या सोशल मीडियावर एक कथित ऑडिओ क्लिप फिरत आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा टाळेबंदी लावावी लागेल. तसेच जे नागरिक कोरोनाचे नियम पाळत नाहीत, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी लागेल, असा संदेश या कथित ऑडिओ क्लिपमधून देण्यात आला आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Feb 18, 2021, 8:10 PM IST

मुंबई - "टाळेबंदी पुन्हा करावी लागेल, नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसतील तर दंडात्मक कारवाई करा", असे सांगणारी ऑडिओ क्लिप माझी नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईसह राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. राज्य शासनाकडून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या नावाखाली सध्या सोशल मीडियावर एक कथित ऑडिओ क्लिप फिरत आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा टाळेबंदी लावावी लागेल. तसेच जे नागरिक कोरोनाचे नियम पाळत नाहीत, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी लागेल, असा संदेश या कथित ऑडिओ क्लिपमधून देण्यात आला आहे. मात्र, आपण असा कोणताच संदेश ऑडिओ क्लिपद्वारे दिलेला नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप माझी नाही, असे स्पष्टीकरण मंत्री टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिले.

ट्विट करून दिली माहिती
ट्विट करून दिली माहिती
ऑडिओ क्लिपमध्ये नेमके आहे तरी काय?
वेगाने कोरोना प्रसारित होत असून प्रसारित सर्व मंगल कार्यालयांना नोटीस पाठवण्याचे आदेश देण्यात यावे. तसेच जे नागरिक कोरोना संदर्भातले नियम पाळत नसतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच नुकत्याच सुरू झालेल्या कोचिंग क्लासेवर छापे टाकण्यात यावेत. मंगल कार्यालये नोटीस पाठवल्यानंतरही नियम पाळत नसतील, तर ती बंद करून टाकावीत, अशा प्रकारचे आदेश या कथित ऑडिओ क्लिपमध्ये देण्यात आले आहेत."
अनेक रुग्ण तपासणीसाठी खासगी रुग्णालयात जातात. मात्र, खासगी डॉक्‍टर त्यांना कोरोना संदर्भातची तपासणी न करण्याचा सल्ला देत आहेत. भाजी मार्केट, दुकानदार यांच्या तपासण्या पुन्हा सुरू करा. तसेच रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, असे आदेश या कथित ऑडिओ क्लिप मधून देण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.