मुंबई - राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भातली माहिती त्यांनी ट्विट करून दिली. तसेच संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

ट्विट करून दिली माहिती -
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे ट्विट त्यांनी केले.
हेही वाचा - गॅरेजला लागलेल्या भीषण आगीत नालासोपाऱ्यात दोन गाड्या भस्मसात