ETV Bharat / state

विक्रोळीत धोकादायक इमारती; हजारो रहिवाशांचे जीव धोक्यात - mhada

म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास इमारत क्रमांक १८६ च्या गॅलरीचा भाग कोसळला.

विक्रोळीत धोकादायक इमारती
author img

By

Published : Jul 9, 2019, 8:45 AM IST

मुंबई - शहरातील जुन्या धोकादायक इमारतींचा प्रश्न पावसाळ्यात आणखीनच गंभीर झाला आहे. विक्रोळी येथील कन्नमवार नगरमध्ये म्हाडा वसाहतीतील जुनाट इमारती कधीही कोसळतील, अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे येथील रहिवासी जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत आहेत. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एका इमारतीचा काही भाग कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

विक्रोळीत धोकादायक इमारती

म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास इमारत क्रमांक १८६ चा गॅलरीचा भाग कोसळला. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच स्थानिक पोलिसांनी धाव घेत ही इमारत खाली केली. ही इमारत ३५ ते ४० वर्षे जुनी आहे.

कन्नमवारनगरमध्ये संक्रमण शिबिराच्या अनेक इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. काही दिवसांपूर्वी घरातील टाकी अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यातच ही घटना घडल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. यावेळी म्हाडा विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. संक्रमण शिबिरातील सर्वच इमारतींची स्थिती गंभीर आहे. अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. लोक जीव धोक्यात घालून राहत आहेत. घरांमध्ये सिलिंग पडण्याच्या दुर्घटना घडत आहेत.

विक्रोळी सोडून आम्ही दुसरीकडे जाणार नाही. आमची राहण्याची व्यवस्था इथेच करावी, अशी रहिवाशांची मागणी आहे. या इमारतीत ३२ कुटुंब वास्तव्यास होते. ऐन रात्री ही इमारत खाली केल्यामुळे या इमारतीच्या रहिवाशांवर रस्त्यावर झोपण्याची वेळ आली आहे.

Intro:मुंबई

कन्नमवार नगर येथील म्हाडा वसाहतींतील जर्जर झालेल्या इमारती कधीही कोसळतील, अशी परिस्थिती आहे. येथील अनेक जुन्या इमारतींना टेकू लावण्यात आले आहेत. त्यामुळे रहिवासी जीव मुठीत घेऊन येथे वास्तव्य करत आहेत. म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोमवारी रात्री सव्वा अकराच्या दरम्यान इमारत क्रमांक 186 चा गॅलरीचा भाग कोसळला यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी भीतीचे वातावरण या भागात आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच स्थानिक पोलिस यांनी धाव घेत ही इमारत खाली केली. ही इमारत 35 ते 40 वर्ष जुनी आहे.

Body:कन्नमवार नगर मध्ये संक्रमण शिबिराच्या अनेक इमारती या धोकादायक अवस्थेत आहेत. काही दिवसापूर्वी घरातील टाकी अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता त्यातच आज ही घटना घडल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. यावेळी म्हाडा विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. संक्रमण  शिबिरातील  सर्वच इमारतीची  गंभीर  स्थिती  आहे. अनेक इमारती मोडकळीस  आल्या  आहेत.  लोक  जीव धोक्यात घालून राहत आहेत. घरांमध्ये सिलिंग पडण्याच्या दुर्घटना रोज घडत आहेत.

आम्ही विक्रोळी सोडून दुसरीकडे जाणार नाही आमची राहण्याची व्यवस्था इथेच करावी असे इकडच्या नागरिकांचे म्हणणे आहे. या इमारतीत 32 कुटूंब वास्तव्यास होते. ऐन रात्री ही इमारत खाली केल्यामुळे या इमारतीच्या रहिवाश्यांवर रस्त्यावर झोपण्याची वेळ आली आहे. कन्नमवार नगर  मधील सर्वच इमारती 30 ते 40 वर्ष जुन्या आहेत. बहुतेक जर्जर झाल्या आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.