मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे हसन मुश्रीफ यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे एफ आय रद्द करावा, चौकशीला स्थगिती द्यावी याबाबत याचिका केली होती. त्याबाबत न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा जरी दिला असला तरी, इडीकडून मात्र त्यांना समन्स बजावले गेले आहे. त्यामुळे ईडीकडून त्यांचा त्रास संपत नाहीय.
नऊ तास छापेमारी : कागलमधील हसन मुश्रीफ यांच्या घरी शनिवारी ईडीकडून तब्बल साडे नऊ तास छापेमारी केली गेली. त्यांच्या घरातील विविध कागदपत्रे पाहणे आणि तपासणे म्हणून ईडी ही कारवाई केली होती. ही कारवाई तब्बल आठ ते नऊ तास चालली. मुंबई ईडी कार्यालयाने हे समन्स दिले आहे. त्याला हसन मुश्रीफ कोणता प्रतिसाद देतात हे आता पाहणे महत्त्वाचे आहे. हसन मुश्रीफ हजर राहण्याची शक्यता कमी आहे. त्यांचे वकील त्यांची त्या ठिकाणी बाजू मांडतील. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हसनमुश्री यांच्यावर कोणतेही चार्जशीट लावले जाणार नाही. त्यांची अटक केली जाणार नाही, याबाबतचे आदेश दिले. तसेच हसन मुश्रीफ यांच्या बाबतची एफ.आय.आर आणि त्यांच्या बाबतची पुणे न्यायाधीशांची कोर्ट ऑर्डर ही केवळ किरीट सोमय्या यांना कळीकाय मिळाली. याबाबत पोलिसांच्या व्यवहारावर ताशेरे ओढत मुंबई उच्च न्यायालयाने दोन दिवसापूर्वीच आदेश दिले होते. आता पुन्हा ईडीने चौकशीसाठी हसनमुश्रीफ यांना हजर राहण्याची नोटीस दिलेली आहे.
पाज जणांचा जबाब : हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा तसेच मुलगा आबिद मुश्रीफ यांच्यासह पाज जणांचा जबाब घेतल्याची माहिती आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांनाही बोलावून मुश्रीफ यांच्या संदर्भात माहिती घेतली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या छापेमारी आणि तपासामध्ये इडीकडून कोणतीही कागदपत्रे जप्त करण्यात आली नाही. मात्र तपासणी आणि चौकशी करण्यात आली होती. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याशी निगडीत कर्ज प्रकरण ईडीकडून हसन मुश्रीफ यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. आतापर्यंत ईडीकडून हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान, पुण्यातील ब्रिक्स कंपनीशी निगडीत तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, मुलीचे घर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्यालय तसेच कागल तालुक्यातील सेनापती कापशी आणि गडहिंग्लज तालुक्यातील हरळी येथील जिल्हा बँकेच्या शाखेवर छापेमारी करण्यात आली आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल : आत्तापर्यंत केलेल्या छापेमारीचा कोणताही तपशील समोर आलेला नाही. दहा वर्षांपूर्वी जुन्या एका वादाचा संदर्भ देऊन हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तो गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुश्रीफ यांनी धाव देखील घेतली आणि त्या वेळेला न्यायालयाने पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर आता पुन्हा ईडीच्या कारवाईची टांगती तलवार मुश्रीफ यांच्यावर आहे. ईडीच्या कार्यालयामध्ये बहुतेक आज हसन मुश्रीफ हे उपस्थित राहणार नाहीत. तर त्यांचे वकील त्यांच्या संदर्भातील तपास कार्यात चौकशी कार्यात सहकार्य करतील असे देखील माहिती सूत्रांकडून प्राप्त होते आहे.
हेही वाचा : Hasan Mushrif: राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल