मुंबई - राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप प्रवेशापूर्वी पाटील यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग आहे. काही केल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबण्यास तयार नाही. हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांमध्ये त्यांचे नाव आघाडीवर होते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी मुंबईचा राजा असणाऱ्या लालबागच्या बाप्पाचे दर्शन घेतले.