ETV Bharat / state

मनसुख हिरेन-वाझे प्रकरण : काय घडले आज दिवसभरात? - अँटिलिया केस 16 मार्च 2021

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲन्टीलिया इमारतीच्या काही अंतरावर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्च अधिकारी सचिन वाझें यांना अटक केल्यानंतर या संदर्भात मुंबई पोलीस खात्यामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

sachin vaze
सचिन वाझे
author img

By

Published : Mar 16, 2021, 7:26 PM IST

Updated : Mar 16, 2021, 7:34 PM IST

मुंबई - अँटिलिया प्रकरणात एनआयने सचिन वाझेंना अटक केली. यानंतर वाझे यांना 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांतून त्यांना निलंबितही करण्यात आले. यानंतर अँटिलिया प्रकरणात वेगवेगळी माहिती समोर येत आहे. याप्रकरणी आज (मंगळवारी) दिवसभरात काय-काय घडामोडी घडल्या, याबाबतचा आढावा.

परमवीर सिंग यांची आयुक्त पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता -

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲन्टीलिया इमारतीच्या काही अंतरावर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्च अधिकारी सचिन वाझें यांना अटक केल्यानंतर या संदर्भात मुंबई पोलीस खात्यामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या महाविकास आघाडी मधील काही नेत्यांची यासंदर्भात बैठक पार पडत असून मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची आयुक्त पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पीपीई कीट घालून सचिन वाझे, की इतर कुणी व्यक्ती? -

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 24 फेब्रुवारीच्या रात्री एक स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने(राष्ट्रीय तपास यंत्रणा) अटक केली आहे. या प्रकरणाचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पीपीई कीट घालून फिरताना दिसत आहे. पीपीई कीट घातलेली व्यक्ती सचिन वाझे, असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे एनआयए वाझे यांना पीपीई कीट घालून चालवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

वाझेंनी जमा केलेल्या पुरावे देखील गायब -मुकेश अंबानी यांच्या घरा शेजारी सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कार प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात तपास अधिकारी असलेल्या सचिन वाझेंनी तपास करताना ठाण्यातील दुकानदाराची डायरी, सीसीटीव्ही फुटेज जप्त केले होते. माञ, या वस्तू कायद्यानुसार त्यांनी रेकॉर्डवर घेतल्या नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपासाच्या नावाखाली वाझे यांनी पुरावे नष्ट केले का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आयुक्तालयातील वाझेंच्या कॅबिनमधून डॉक्युमेंट, मोबाईल, कॉम्प्यूटर जप्त -

अँटिलिया स्फोटक प्रकरणात पोलिसांचा सहभाग समोर आल्याने येणाऱ्या काळात संबधित अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी होण्याची शक्यता आहे. आयुक्तालयात वाझेंच्या गाडीची नोंद ठेवली जात नव्हती. आज (मंगळवारी) वाझे बसत असलेल्या आयुक्तालयातील कँबिनमधून एनआयएने डॉक्युमेंट, मोबाइल, ते वापरत असलेला कॉम्प्युटर जप्त केला आहे. आयुक्तालयात सीसीटीव्ही नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यामुळे वाझेंच्या गाडीची ओळख पटवणे मुश्किल झाले आहे.

काझींचाही यात समावेश -

मुंबई पोलीस दलातील आतापर्यंत ७ जणांची चौकशी करण्यात आली आहे. विक्रोळीतील त्या गाडीची चोरी होणे म्हणजे सोंग आहे. वाझेंच्या घरचा CCTV ताब्यात घेतल्या बाबत वरिष्ठांना कोणतीही माहिती नाही. काझीचांही या गुन्ह्यात समावेश, ठाण्यातील दुकानातुन नंबर प्लेट, सीपीयू, सीसीटीव्ही आणले. पुरावे रेकॉर्डवर न आणल्याने ते कृत्य पुरावे नष्ठ करण्याच्या हेतूनेच केले गेले आहे.मनसुख हिरेनवर या संपूर्ण प्रकरणात संशय होताच. १७ फेब्रुवारी रोजी गाडी चोरीची तक्रार घेण्यासाठी विक्रोळी पोलीस ठाण्यात एका अधिकाऱ्याने फोन केला होता. अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत वाझेंनी ती कार वापरली नसल्याचे सांगितले होते. स्फोटकांनी गाडी सापडली त्यावेळी वाझे मुख्यालयात होते.

तिसरी गाडी ताब्यात -

स्कॉर्पिओ, इनोव्हानंतर आता स्फोटक प्रकरणी एनआयएने तिसरी गाडी ताब्यात घेतली. आता या प्रकरणात मर्सिडिज कार नवा खुलासा होण्याची शक्यता आहे.

काय आहे मर्सिडिज कारची थेअरी?

या प्रकरणात NIA संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात सीएसएमटी स्थानकाबाहेर मनसुख हिरेन कोणाची तरी वाट पाहत असल्याचा फुटेज एनआयएच्या हाती लागला. या सीसीटीव्ही एक मर्सडिज कार येते आणि मनसुख हिरेन त्या कारमध्ये बसुन जातात. एनआयएला असा संशय आहे की, मनसुख हिरेन हे त्यानंतर बेपत्ता झाले. याच प्रकरणी ही मर्सडिज कार तपासाचा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे.

हेही वाचा - 'एटीएस', 'एनआयए' आधी मुंबई पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे पळविले

हेही वाचा - राष्ट्रवादीच्या बैठकीत गृहमंत्री किंवा आयुक्त बदलावर चर्चा नाही -जयंत पाटील

Last Updated : Mar 16, 2021, 7:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.