मुंबई - फिर एक बार मोदी सरकरचा नारा भाजप देत असली तरी मोदींच्या गुजरातसह मुंबईतील( माटुंगा) अडीचशे व्यापारी मोदींविरोधात एकवटले आहेत. त्यांनी काँग्रेसचे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांना आज जाहीर पाठिंबा दिला आहे.
माटुंगा येथे आयोजीत प्रचार सभेसाठी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण येणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्या अनुपस्थितित व्यापाऱ्यांनी मोदी सरकरच्या कारभाराचे वाभाडे काढले.
एकनाथ गायकवाड म्हणाले, मला सहापैकी ५ वेळा निवडून दिले. २०१४ मधे मोदी लाटेत आम्ही हरलो. मोदींनी व्यापारातून देश मोठा करण्याचे स्वप्न दाखवले होते. संसदेतील प्रश्नोत्तराचा तास महत्वाचा असतो. नरेंद्र मोदी प्रश्नोत्तराच्या तासाला दांडी मारतात. देश व्यक्तीकेंद्री झाला. नोटबंदी सपशेल अपयशी ठरली. मोदींच्या शिक्षणाचा पत्ता नाही, असे आरोपी एकनाथ गायकवाड यांनी केले.
काँग्रेसने महात्वाकांशी योजना राबवल्या. माहितीचा अधिकार, अन्न सुरक्षेचा कायदा केला. भाजपने ढोंगी साधूंना संसदेत आणले. त्यामुळे प्रगतीसाठी काँग्रेसला साथ द्या, असेही ते म्हणाले.