ETV Bharat / state

Gujarat Assembly Elections : गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भाजप नेत्यांची मोठी फौज गुजरातला जाणार

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भाजप नेत्यांची मोठी फौज गुजरातला जाणार ( Maharashtra BJP Leaders In Gujarat ) आहे. आमदार योगेश सागर यांच्या नेतृत्वात राज्यातील भाजपा नेत्यांची टीम गुजरातला जाणार ( Gujarat Assembly Elections ) आहे. या टीममध्ये १२ आमदार आणि पदाधिकारी अशा एकूण ५० जणांचा समावेश आहे.

Gujarat Assembly Elections
गुजरात विधानसभा निवडणुक
author img

By

Published : Oct 30, 2022, 3:15 PM IST

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भाजप नेत्यांची मोठी फौज गुजरातला जाणार ( Maharashtra BJP Leaders In Gujarat ) आहे. आमदार योगेश सागर यांच्या नेतृत्वात राज्यातील भाजपा नेत्यांची टीम गुजरातला जाणार ( Gujarat Assembly Elections ) आहे. या टीममध्ये १२ आमदार आणि पदाधिकारी अशा एकूण ५० जणांचा समावेश आहे. निवडणुका घोषित करण्यापूर्वीच भाजपकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.

६ जिल्हे ३३ मतदार संघ! : मुंबईतील पक्षाचे आमदार योगेश सागर आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांच्या नेतृत्वात एकूण १२ आमदार आणि अन्य पदाधिकारी अशा ५० जणांची एक टीम तयार करण्यात आली आहे. गुजरातमधील सहा जिल्ह्यांच्या ३३ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. दक्षिण गुजरातमधील डांग, वलसाड, नवसारी, सुरत, तापी आणि भरुच या सहा जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. हे सगळे जण काही दिवसांपासून गुजरातचे दौरे करीत आहेत. निवडणूक जाहीर होईल त्या दिवशीपासून मतदानाच्या दिवसापर्यंत हे सगळे गुजरातमध्येच मुक्कामी ( Maharashtra BJP Leaders Gujarat Stay Till voting ) असतील.

महाराष्ट्र, गुजरात कनेक्शन? : मुंबईत गुजराती मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. येथील गुजराती समाजाच्या नेत्यांशी गुजरातमध्ये असलेला कनेक्शन लक्षात घेऊन त्यांना या मोहिमेवर धाडण्यात आले आहे. या शिवाय गुजरातला लागून असलेल्या जळगाव, नाशिक जिल्ह्यांतील आमदारांवरही जबाबदारी टाकण्यात आली आहे. योगेश सागर यांच्यासह मनीषा चौधरी, संजय सावकारे, संजय केळकर, पराग अळवणी, सिद्धार्थ शिरोळे, राम सातपुते, निरंजन डावखरे, सुरेश भोळे, राहुल ढिकले, राजेश पाडवी, उमा खापरे या आमदारांच्या खांद्यावरही जबाबदारी दिली आहे.

"आप" सुद्धा मैदानात? : महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये पळविले जात असतानाच तेथील आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महाराष्ट्र भाजपची मदत घ्यावी लागली आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरातमधील सहा जिल्ह्यांमध्ये ५० हून अधिक नेत्यांची कुमक पाठविण्यात आली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणखी काही जणांना पाठविले जाणार आहे. विशेष करून "आप" सुद्धा गुजरातमध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने ही निवडणूक फार चुरशीची होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.