ETV Bharat / state

यंदा पाडव्यावर कोरोनाचे सावट; गिरगावातील प्रसिद्ध गुढीपाडव्याची शोभायात्रा रद्द

गुढीपाडव्याच्या सण उत्साहात साजरा करण्यासाठी लाखो लोक गिरगाव येथे एकत्र येतात. मात्र, यंदा देशावर तसेच राज्यावर कोरोनाचे संकट आले आहे. त्यामुळे आयोजकांनी काळजी घेत यंदा गुढीपाडव्याच्या सणानिमित्त होणाऱ्या शोभायात्रा आणि उत्सवाचे आयोजन रद्द केले आहे.

गिरगावातील प्रसिद्ध गुढीपाडव्याची शोभायात्रा रद्द

author img

By

Published : Mar 24, 2020, 3:24 PM IST

मुंबई - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून याचा फटका हा सर्व क्षेत्रात पाहायला मिळत आहे. त्यामध्येच उद्या हिंदू बांधवांचा गुढीपाडव्याचा सण आहे. गुढीपाडवा म्हणजे हिंदू बांधवांचे नववर्ष. मात्र, यंदा या गुढीपाडव्याच्या सणावर कोरोनाचे सावट आहे. पाडव्याचा सण महाराष्ट्रात तसे मुंबईत मोठ्या दिमाखात साजरा होतो. परंतु यंदा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचारबंदी असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पाडवा उत्साहात साजरा होणार नाही.

गिरगावातील प्रसिद्ध गुढीपाडव्याची शोभायात्रा रद्द

गुढीपाडव्याच्या सणाला मुंबई गिरगाव येथे भव्य शोभायात्रा रथ निघण्याची परंपरा आहे. लाखो लोक या गुढीपाडव्याच्या सण उत्साहात साजरा करण्यासाठी गिरगाव येथे एकत्र येतात. मात्र, यंदा देशावर तसेच राज्यावर कोरोनाचे संकट आले आहे. त्यामुळे आयोजकांनी काळजी घेत यंदा गुढीपाडव्याच्या सणानिमित्त होणाऱ्या शोभायात्रा आणि उत्सवाचे आयोजन रद्द केले आहे.

हेही वाचा - 'मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर मोक्का लावा'

गुढीपाडव्याचा सण आला की एक-दोन दिवस अगोदरच पाडव्याची तयारी करण्यासाठी गिरगावात लगबग सुरू होते. मात्र, यंदा राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू असल्यामुळे गिरगावमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने होणाऱ्या शोभायात्रेतील रस्त्यांवर शुकशुकाट पसरलेला आहे. एकंदरीत कोरोनाचे सावट या गुढीपाडव्याच्या सणावर आले आहे, असं म्हणता येईल.

हेही वाचा - 'कठोर पावले उचलायला भाग पाडू नका, घरीच रहा'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.