ETV Bharat / state

महिलांसाठी लोकल सुरू करण्यासाठी पियुष गोयल यांच्याशी चर्चा करणार - पालकमंत्री

मुंबईत महिलांसाठी लोकल सेवा सुरू करण्याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले.

लोकल रेल्वे
लोकल रेल्वे
author img

By

Published : Oct 19, 2020, 9:15 PM IST

Updated : Oct 19, 2020, 10:23 PM IST

मुंबई - घटस्थापनेच्या दिवशीपासून महिलांना रेल्वे प्रवासास मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार आम्ही सर्व सुरळीत करण्यास तयार होतो. मात्र, परवानगी न मिळाल्याने याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

बोलताना पालकमंत्री

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रेल्वे सेवा महिलांसाठी सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस होता. मात्र, रेल्वे बोर्डाकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे, अटी व शर्ती लागू करण्यात आल्याने व रेल्वे सेवा सुरू करण्यास मान्यता नसल्याने महिलांसाठी रेल्वे सेवा सुरू होण्यास विलंब लागत असल्याचे, मत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केले. आपण स्वतः रेल्वेसेवा सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी बोलणार असल्याचे अस्लम शेख यांनी शेवटी सांगितले.

हेही वाचा - पहिल्या दिवशी 6727 प्रवाशांनी केला मेट्रोने प्रवास

Last Updated : Oct 19, 2020, 10:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.