मुंबई : मालाड परिसरातील २८ वर्षीय ग्राफिक डिझायनरने एका लोन अँपच्या विरोधात कुरार पोलीस ठाण्यात तक्रार (Graphic designer police complaint against loan app) नोंदवली आहे. यासंबंधी अँपच्या माध्यमातून डिझायनरने कर्ज घेतले होते आणि त्याची परतफेड देखील करण्यात आली होती. मात्र, तरीही जादाचे पैसे मागितले जात होते. Graphic Designers Photo Morph, Latest news from Mumbai, Mumbai Crime,
मुलीचे मॉर्फ केलेले फोटो शेअर : कंपनीला पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांचे फोटो मॉर्फ (Graphic designers photo morph and viral) केलेले अश्लील फोटो त्यांच्या संपर्कातील लोकांसोबत शेअर (graphic designer obscene photos shares ) करण्यात आले. त्यामुळे घाबरलेल्या ग्राफिक डिझायनरने कुरार पोलीस ठाणे गाठले.
मुलीला अँपकडून धमक्या, शिवीगाळ : तक्रारदार ग्राफिक डिझायनरने इंटरनेटवर शोध घेतल्यानंतर त्याच्या फेसबुक प्रोफाइलवरील लिंकद्वारे हे कर्ज अँप डाउनलोड केले. त्यात पीडितेने त्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक तपशील आणि त्याचे छायाचित्र अँपवर शेअर केले. त्याने कर्ज घेतले आणि त्याची परतफेड केली होती. अँपवर विश्वास बसल्याने त्याने दुसऱ्यांदा कर्जासाठी अर्ज दाखल केला. २१ हजार सहाशे रुपये परत देखील केले. दुसरीकडे त्याला त्या अँपकडून धमक्या आणि अपमानास्पद शिवीगाळ करणारे कॉल येऊ लगे. ज्यांनी त्याला अधिक पैसे देण्याकरिता नाहक त्रास दिला.