ETV Bharat / state

पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊनही करतोय गटार साफ, बेकारीमुळे ओढावली परिस्थिती

बेकारीमुळे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणावर गटारे साफ करण्याची वेळ आलेली आहे. त्याला त्याची परिस्थिती सांगताना अश्रू अनावर होत होते.

गटार काम करणारा तरुण पवन शंकर खडसे
author img

By

Published : May 17, 2019, 3:01 PM IST

मुंबई - गावात भीषण दुष्काळ असल्यामुळे शेतीमध्ये पीक होत नाही. त्यामुळे बेकारी आली आहे. पदवीचे शिक्षण घेतल्याने हाताला काहीतरी काम मिळेल या उद्देशाने मुंबईत आलो. मात्र, याठिकाणी मिळेल ते काम करण्याची वेळ आली. त्यामुळे आज गटारात उतरून गटार स्वच्छ करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कुणी मुलगीही द्यायला तयार नाही. ही करुण कहाणी आहे बेकारीमुळे गटारकाम करणारा पवन खडसेची...

गटार काम करणारा तरुण पवन शंकर खडसे

पवन शंकर खडसे हा मुळचा वाशीम जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे २००१ साली पोलीस भरतीसाठी अर्ज केला होता. मैदानी गुण कमी मिळाल्याने पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे.

पोलीस भरतीला आलेली त्यांच्यासोबतची मुले भरती झाली. मी प्रयत्न करायचो पण बेकारी असल्याने घरची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे काम करावे लागत असे. मी आज मुंबईत गटारातील घाण, गाळ काढतो. त्यामुळे आज मला कोणीही मित्र बोलत नाहीत. लग्न करावे यासाठी पाहुणे मुलगा काय करतो? हे विचारतात. गटार सफाईचे काम करतो, असे माहिती झाल्यास पाहुण घरीच येत नाही. अशी वेळ कोणत्याही तरुणावर येऊ नये, असे म्हणत पवन खडसेंनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

Intro:गावी पडलेला दुष्काळ बेकारीमुळे मुंबईच्या गटारातील घाण उचलतो त्यामुळे कोणीही मुलगी देत नाही.

बेकारीमुळे गावात हाताला काम नाही. गावी थोडीशी शेती त्यात उत्पन्न कमी पडलेला दुष्काळ पिण्यासाठी पाणी नाही .विकतचे पाणी घेणे परवडत नाही. त्यासाठी मुंबईत तरी हाताला काम मिळेल या आशेने आलो होतो. मुंबईत आल्यानंतर काही दिवस पदवी झाली असल्याने फिरलो चांगले काम मिळेल या आशेने पण येथेही काम मिळत नसल्याने शिवाजीनगर च्या नाक्यावर थांबून मिळेल ते काम करण्यासाठी जावे लागले .त्यामुळे आज जरी गटारात उतरताना कामाचा कमी पणा वाटत असला तरी गटारात उतरतो आणि दिवसाची चिंता मिटते असे वाशीम येथून कामाच्या शोधात बेकारीमुळे गटारकाम करणारा पवन खडसे म्हणालाBody:गावी पडलेला दुष्काळ बेकारीमुळे मुंबईच्या गटारातील घाण उचलतो त्यामुळे कोणीही मुलगी देत नाही.

बेकारीमुळे गावात हाताला काम नाही. गावी थोडीशी शेती त्यात उत्पन्न कमी पडलेला दुष्काळ पिण्यासाठी पाणी नाही .विकतचे पाणी घेणे परवडत नाही. त्यासाठी मुंबईत तरी हाताला काम मिळेल या आशेने आलो होतो. मुंबईत आल्यानंतर काही दिवस पदवी झाली असल्याने फिरलो चांगले काम मिळेल या आशेने पण येथेही काम मिळत नसल्याने शिवाजीनगर च्या नाक्यावर थांबून मिळेल ते काम करण्यासाठी जावे लागले .त्यामुळे आज जरी गटारात उतरताना कामाचा कमी पणा वाटत असला तरी गटारात उतरतो आणि दिवसाची चिंता मिटते असे वाशीम येथून कामाच्या शोधात बेकारीमुळे गटारकाम करणारा पवन खडसे म्हणाला.

महाराष्ट्रात ग्रामिण भागातील दुष्काळाची दाहकता शहरीभागात हाताला काम मिळेल या आशेने तरुणाचे आलेले लोंढे दोनवेळेच्या जेवणाची सोय होईल या आशेने तरुण पिढी बेकारीमुळे हाताला कोणतेही काम करून दिवसाची भरती करत आहेत. त्यातच गटारात उतरून घाण काढणे हे काम करताना पाहायला मिळत आहे.

पवन शंकर खडसे रा. वाशीम हा मुंबईत गटार कामासाठी विक्रोळीच्या पश्चिम भागातील सम्राट अशोक सोसायटीतीच्या बाजूच्या नाल्यात उतरला हातात कोणतीही सुरक्षा साहित्य नाही. पायात चप्पल नाही सुरक्षा बूट नाही. खडसे म्हणाला माझे शिक्षण पदवी पर्यंत झाले आहे.2001 ला पोलीस भरतीसाठी अर्ज केला होता. मैदानी गुण कमी मिळाले त्यामुळे माझे पोलीस होण्याचे स्वप्नं अपूर्ण राहिले .पोलीस भरतीला आलेले माझ्या सोबतीचे मुलं भरती झाले .मी प्रयत्न करत असायचो पण बेकारी असल्याने घराची जबाबदारी माझ्यावर त्यामुळे काम करावे लागायचे . मी आज मुंबईतील गटारातील घाण, गाळ काढतो त्यामुळे आज मला कोणीही मित्र बोलत नाहीत.लग्न करावे यासाठी पाहुणे विचारतात मुलगा काय काम करतो त्याना माहिती मिळाली की,मुंबईतील गटारातील घाण उचलतो त्यामुळे आमच्या घरी कोणीही पाहुणे येत नाहीत. मुंबईत काही दिवस काम करून पावसाळ्यात गावाकडे जातो थोडे फार पैसे असतात .अशी माझ्यासारखी वेळ कोणत्याही तरुणावर येऊ नये असे म्हणताच पवन खडसेंनी डोळे भरून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.