मुंबई - माझे शासन समाजीतील सर्व घटकांना न्याय देण्यासठी कटीबद्ध असून, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांच्या आदर्शाचे पालन करेल असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त व चिंतामुक्त करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करेन. त्याचबरोबर माझे शासन १० रुपयामध्ये ताजे व सकस जेवण देणार असल्याचेही राज्यपाल म्हणाले. विधानसभेत आज राज्यपालांचे अभिभाषण झाले. यावेळी त्यांनी सभागृहातील नवनिर्वाचीत सदस्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
आज विधानसभेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अभिभाषण दिले. यावेळी त्यांनी सभागृहातील सर्व सदस्यांचे स्वागत केले. माझे शासन हे संविधानातील सर्व घटकांच्या मूल्यांचे पालन करीन असे कोश्यारी म्हणाले.
राज्यपालांच्या अभिभाषणातील महत्वाचे मुद्दे
- खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना आरक्षण देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणार
- महापुरामुळे राज्यातील अनेक भागात नुकसान झाले आहे. बहुतांश भागात आल्या दुष्काळामुळे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि महापुरामुळे नुकसान झालेल्यांना आवश्यक ती मदत करेन
- बेरोजगारमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार
- महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
- महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून, आवश्यक त्या उपाययोजन करेन
- दुर्लब घटकातील मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी प्रयत्न
- नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृहे बांधणार
- झोपडपट्टी धारकांसाठी पुनर्वसन योजना प्रकल्प राबवणार
- रोगनिदान चाचणी करण्यासाठी १ रुपयामध्ये क्लिनीक ही योजना सुरु करणार
- राज्यामध्ये नवीन उद्योग करणार
- अनुसूचित जाती जमातीसह वंचित समाजासाठी काम करणार, त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणार
- गड किल्ले, पर्यटन स्थळांचे जतन करणार
- मराठी भाषा केंद्र स्थापन करणार