मुंबई राज्यामध्ये लंपी आजाराने धुमाकूळ घातलाय, कोरोना महामारीनंतर लंपी आजार आल्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसलेला आहे. त्यांचे आर्थिक नुकसान झालेलेच आहे. मात्र पशुधनाचेही नुकसान झाले आहे. यावर उपाय म्हणून तरुण शिकलेला शेतकरी शरद मरकड याने पुढाकार घेतला आणि स्वतः लंपी आजारावर उपाय म्हणून गुरांची पहिली छावणी सुरू केली आहे.
लंपी आजाराने धुमाकूळ घातलेला राज्यामध्ये साधारणता हजारो गाई, म्हशी, बैल, वासरू यांना लंपी आजाराने घेतलेला आहे. अनेक ठिकाणी शेकडो जनावरे मरून पडले, याच्या बातम्या आपण ऐकले व पाहिले असाल. गुजरातमध्ये या आजाराची सुरुवात झाल्याचं आपण ऐकलं असणार सबंध देशभर लंपी आजाराने धुमाकूळ घातलेला आहे. पशुधन शेतकऱ्याचे गेलं त्याच्यामुळे शेतातून कमवायचं कसं, पिकवायचं कसं आणि घर चालवायचं कसं, हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा आहे
सरकारी आरोग्य यंत्रणा यासंदर्भात शरद मरकड यासोबत ईटीव्ही भारतने संवाद साधला आणि शरद यांनी कशाप्रकारे लंपी आजाराच्या गुरांची छावणी सुरू केली आहे. शरद मरकड म्हणाले की लंपी आजारावर ही पहिलीच गुरांची छावणी आम्ही सुरू केलेली आहे. आमच्या डोळ्यासमोर पशुधन मरत आहे, आणि त्यांना वाचवायला कुणीतरी पुढे आलं. पाहिजे तर आष्टी तालुक्यातील सरकारी आरोग्य यंत्रणा Government health system त्यांना विनंती केली आहे. त्यांनी आम्हाला मदत केली आणि नगर जिल्ह्याच्या आसपास असलेली जनावरं रोज 40 ते 50 संख्येने आमच्या छावणीमध्ये भरती होत आहेत. एक जनरल वॉर्ड केलेला आहे. एक आयसीयू वार्ड केलेला आहे .मात्र दोन दिवसातल्या पावसामुळे त्याच्यावर खूप फटका बसला आहे. तरीही आम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून छोटी मोठी मदत मिळवून घरातून पैसा टाकून गुरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत.