मुंबई - राष्ट्रपती राजवटीच्या आडून महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा आणि मुंबईला केंद्रसशासित प्रदेश बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा - ...तर जावडेकर यांनी इफ्फीच्या उद्घाटनास येवू नये - दिगंबर कामत
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील यावर प्रकाश आंबेडकर यांनी शंका उपस्थित केली आहे. सत्ता स्थापनेच्या चर्चेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी कींवा काँग्रेसचा एकही बडा नेता आम्ही शिवसेनेसोबत जायला तयार आहोत असे का सांगत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा कट हाणून पाडण्यासाठी लढा उभारणार असल्याचेही आंबेडकर यावेळी म्हणाले.