ETV Bharat / state

गोरक्षा, समाजसेवा अन् भव्य मंदिर निर्माण हीच आमची पुढील वाटचाल - मिलिंद परांडे

author img

By

Published : Nov 18, 2019, 7:39 AM IST

गोरक्षा हा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यावर विश्व हिंदू परिषद आता पुढे काम करणार आहे, असे आज पत्रकार परिषदेत  परांडे यांनी सांगितले.

विश्व हिंदू परिषद

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राम मंदिराचा विषय संपला आहे. त्यामुळे आमची पुढची वाटचाल ही गोरक्षा, समाजसेवा, आरोग्य सेवा, तसेच भव्य मंदिर निर्माण या विषयावर असणार आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे यांनी दिली.

अनेक वर्षांपासून राम मंदिराचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित होता. त्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे आता हिंदू समाजात ज्या समस्या आहेत. त्या सोडविण्याकडे विश्व हिंदू परिषद लक्ष देईल. त्यामुळे आता विश्व हिंदू परिषदेने देशातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदतीसाठी सायन येथे आरोग्य केंद्र उभारले आहे. तसेच गोरक्षा हा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यावर विश्व हिंदू परिषद आता पुढे काम करणार आहे, असे आज पत्रकार परिषदेत परांडे यांनी सांगितले.

दरम्यान मुस्लीम बोर्डला 5 एकर जमीन देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ३ महिन्यात राम मंदिराच्या कामाला सुरुवात होईल, असा विश्वास परांडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Intro:गोरक्षा ,समाजसेवा ,भव्य मंदिर निर्माण यावर आमची पुढील वाटचाल विश्व हिंदू परिषद

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर राम मंदिराचा मोठा विषय संपला आहे .त्यामुळे आमची पुढची वाटचाल ही गोरक्षास समाजसेवा,आरोग्य सेवा, तसेच भव्य मंदिर निर्माण या विषयावर असणार आहे तसेच जे 60% दगड आणि मंदिर निर्मितीसाठी वापरण्यासाठी प्रयत्नशील असणार आहोत कारण हा हिंदू आस्थेचा विषय आहे तसेच मंदिरासाठी कोणत्याही प्रकारच्या देणगीचे आव्हान हिंदू परिषद किंवा मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही असे विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

Body:जो अनेक वर्षांपासून राम मंदिराचा मुद्दा कोर्टात प्रलंबित होता त्याला अखेर पूर्णविराम मिळालेला आहे त्यामुळे आता हिंदू समाजातील समस्या आहेत त्या सोडविण्याकडे विश्व हिंदू परिषद लक्ष देईल त्यामुळे आता विश्व हिंदू परिषदेने देशातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदतीसाठी सायन येथे आरोग्य केंद्र उभारलेला आहे तसेच गोरक्षा हा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे यावर निखिल विश्व हिंदू परिषद आता पुढे काम करणार आहे असे आज पत्रकार परिषदेत महामंत्री परांडे यांनी सांगितले

तसेच सुप्रीम कोर्टाचा निर्णय पाच शून्य असा राम मंदिराच्या बाबतीत आला आहे .ही भूमी रामाची जागा आहे कोर्टात मान्य झाले आहे. जमिनीच्या खाली बाराव्या शतकातील मंदिराचे अवशेष मिळालेले आहेत. कोर्टात सादर केलेल्या पुराव्यानुसार तरी देखील निर्णय राम ललाचा बाजूने लागला असताना , मुस्लिम बोर्डला 5 एकर जमीन कोर्टाने देण्याचा निर्णय दिला आहे जर पाच एकर जमीन देण्याचा निर्णय दिला असताना, घेत नसतील तर तो त्यांचा विषय आहे तीन महिन्यात राम मंदिराच्या कामाला सुरुवात होईल असा विश्वास हिंदू विश्व परिषद आंतरराष्ट्रीय महामंत्री परांडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. केंद्र सरकार पूर्णपणे याबाबतीत सक्षम पणे काम पूर्ण करेल असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला. बाबर विदेशी होता राम देशाचे आहेत याचा विचार देशातील मुस्लिमांनी केला पाहिजे असे परांडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले

Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.