ETV Bharat / state

भाजपच्या गोपीचंद पडळकरांचे पहिलेच अधिवेशन हुकले! - गोपीचंद पडळकर कोरोना पॉझिटिव्ह बातमी

गोपीचंद पडळकर यांची काल कोरोना तपासणी केली असता, त्यांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला. यामुळे भाजपकडून राष्ट्रवादीविरोधात सभागृहात आणण्यात आलेल्या आमदार पडळकरांचे पहिलेच अधिवेशन हुकले आहे.

गोपीचंद पडळकर
गोपीचंद पडळकर
author img

By

Published : Sep 7, 2020, 7:27 PM IST

मुंबई : विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सकाळपासून सुरुवात झाली. मात्र, या अधिवेशनात भाजपकडून मोठा गाजावाजा करत विधानपरिषदेत आणलेले गोपीचंद पडळकर यांचा आज सभागृहाला परिचय होऊ शकला नाही. पडळकर यांची काल कोरोना तपासणी केली असता, त्यांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला. यामुळे भाजपकडून राष्ट्रवादीविरोधात सभागृहात आणण्यात आलेल्या आमदार पडळकरांचे पहिलेच अधिवेशन हुकले आहे.

विधान परिषदेचे कामकाज दुपारी १२ वाजता सुरू झाल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. यात शिवसेनेच्या सदस्या डॉ. नीलम दिवाकर गोऱ्हे, राष्ट्रवादीचे सदस्य शशिकांत जयवंतराव शिंदे, अमोल रामकृष्ण मिटकरी, भाजपचे रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, रमेश काशिराम कराड, प्रवीण प्रभाकरराव दटके, तर काँग्रेसचे राजेश धोंडिराम राठोड या नवनिर्वाचित सदस्यांचा समावेश होता. मात्र, भाजपकडून आपल्या अनेक मातब्बर नेत्यांना डावलून विधानपरिषदेवर आणलेले पडळकर मात्र पहिल्याच अधिवेशनात सभागृहात आपला परिचयही करून घेऊ शकले नाहीत.

दरम्यान, विधानपरिषदेच्या दोन दिवसांच्या कामकाजासाठी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेत डॉ. मनिषा कायंदे, सर्वश्री प्रसाद लाड, संजय दौंड, अमरनाथ राजूरकर यांची तालिका सभापती म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा केली.

हेही वाचा - वैद्यकीय प्रवेशासाठीचे 70:30 चे धोरण होणार रद्द; मराठवाड्यातील लाखो विद्यार्थ्यांना फायदा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.