मुंबई - आज मुंबईकरांच्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. समुद्रात आणि कृत्रिम तलावात गणेश विसर्जन केले जात असून कृत्रीम तलावात रात्री 9 पर्यत 2901 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.
गणेश विसर्जन सुरळीत पार पडावे म्हणून पालिकेने विविध सोयी सुविधा दिल्या आहेत. तसेच पर्यावरणाचे रक्षण करता यावे म्हणून मुंबईत कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. दादर शिवाजी पार्क येथे दुपारी 12 वाजेपर्यंत 18 घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्याचवेळी पालिकेच्या जिमखाना येथे बनवण्यात आलेल्या कृत्रिम तलावाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत कृत्रिम तलावात 36 हुन अधिक मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले आहे. सायंकाळी दादर चौपाटीवर गणेश भक्तांची गर्दी उसळून समुद्रात मोठ्या प्रमाणात विसर्जन केले जाऊ शकते अशी माहिती गणेश भक्तांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - गणेश विसर्जन : पवई तलावात घरगुती गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात
मुंबईत रात्री 9 पर्यंत 22168 गणेश मूर्तींचे विसर्जन -
मुंबईत रात्री 9 पर्यंत 22168 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. त्यापैकी 2901 मूर्तींचे विसर्जन कृत्रीम तलावात करण्यात आले आहे. तर, विसर्जनादरम्यान कोणतीही दुर्घटना घडली नसल्याची माहिती आहे.