मुंबई - गोंदिया जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी उपनगराध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक अशोक गुप्ता यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, महिला व बालविकास मंत्री यशोमतीताई ठाकूर, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार. सहसराम कोरोटे, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, गोंदिया जिल्हा अध्यक्ष डॉ. नामदेवराव किरसान व जिल्हा सरचिटणीस अॅड. योगेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत हा प्रवेश कार्यक्रम पार पडला.
विधानभवनातील काँग्रेस पक्ष कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात अशोक गुप्ता यांच्यासह, राजकुमार पटले, माजी तालुकाध्यक्ष प्रकाश देवाधारी, पंचायत समिती सदस्य विजय उके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, चुनेश पटले, नरेंद्र चिखलोंडे, गोपाल अजनीकर, आसीफ अहमद अली, योगेश भेलावे, महेश पाचे, सचिन मेश्राम, मनिष लांजेवार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. या सर्वांच्या पक्ष प्रवेशामुळे गोंदिया जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत होईल, असे थोरात म्हणाले.
हेही वाचा - शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण; सत्ताधारी, विरोधक आमने-सामने
हेही वाचा - सरकारी निवासस्थानाचे घरभाडे थकविल्याप्रकरणी राज्यपाल कोश्यारींना उत्तराखंड उच्च न्यायालयाची नोटीस