मुंबई Gold Smuggling Racket : महसूल गुप्तचर संचालनालयानं (डीआरआय) सोनं वितळणाऱ्या तसंच दागिन्यांच्या दुकानावर छापा टाकलाय. यात तब्बल 3.62 कोटी रुपयांचं तस्करीचं सोनं तसंच 2.95 कोटी रुपये रोख आणि 2.1 किलो सोनं जप्त करण्यात आलंय. या संदर्भात आठ जणांना अटक करण्यात आलीय, यात चार केनियन आणि एका टांझानियन महिलांचा समावेश आहे, ज्यांचा तस्करीच्या वापर करण्यात आला होता, अशी माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.
गुप्तचरांच्या माहितीवरून डीआरआयनं तस्करीचं सोनं वितळण्यासाठी वापरल्या जाणार्या परिसराची गुप्तपणे झडती घेतली. त्यानंतर तस्करीचं सोनं खरेदी करणार्या एका ज्वेलर्सच्या आवारात झडती घेतल्याचं डीआरआयनं सांगितलंय. (Major gold smuggling racket busted by DRI)
कोट्यवधी रुपये जप्त : या छापेमारीत देशात तस्करी केलेलं 2.1 किलो सोनं, 1 लाख अमेरिकन चलन म्हणजे 84.15 लाख भारतीय रुपये, तसंच 2.32 कोटी रुपयांची रोकड, दागिन्यांच्या दुकानातून जप्त करण्यात आलंय. तसंच मुंबईतील हे दागिन्यांचे दुकान सील करण्यात आल्याचं डीआरआयनं सांगितलंय. या दुकानाचा मालक हा इतर प्रकरणांमधील वॉन्टेड आरोपी असल्याचंही डीआरआयनं सांगितलंय. तसंच डीआरआयनं माहिती मिळाल्यानंतर मुंबईतील दोन हॉटेलजवळ सापळा रचला. त्या हॉटेलमध्ये तो आरोपी आणि त्याचा भागीदार हे सोन्याचा व्यवहार करत होते. डीआरआयनं कारवाई करून या दोघांना ताब्यात घेतलंय. या टोळीला सोने तस्करीच्या मोबदल्यात तब्बल 2 कोटी 78 लाख 70 हजार रुपये मिळाले होते.
आठ जण ताब्यात : आफ्रिकन महिलेच्या माध्यमातून केलेली तस्करी, परदेशी चलन आणि भारतीय चलन मिळवण्यासाठी सोनं वितळवण्याची सुविधा पुरवणाऱ्या मालक आणि ऑपरेटरची माहिती डीआरआयला मिळाली. यानंतर एग्रीग्रेटस तस्करी केलेलं सोनं विविध कॅरीअरकडून गोळा केलं जायचं. केनियन आणि टांझानियन महिला या सोने तस्करीसाठी कॅरीअर म्हणून काम करत होत्या. या सोने तस्करी प्रकरणात आतापर्यंत डीआरआयनं 4 केनियन महिला आणि 1 टांझानियन महिलेसह 3 भारतीयांसह 8 जणांना अटक केलीय.
हेही वाचा :
- Eight Crores Gold Seized : अबब...! मुंबईहून तस्करी होणारे आठ कोटी रुपयांचं सोनं जप्त, दोन तस्करांची चौकशी सुरू
- Gold Smuggling : विमानतळावर 2.01 कोटींच तस्करींच सोनं जप्त, तस्करीकरिता 'ही' वापरली युक्ती
- Gold Smuggling News : प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून दोन किलो सोन्याच्या पेस्टची तस्करी, विमानतळावरून दोघांना अटक