ETV Bharat / state

Gokhale flyover : अंधेरीतील गोखले उड्डाण पूल आजपासून पाडण्यास सुरूवात, पश्चिम रेल्वे मार्गावर चार दिवस मेगाब्लॉक

author img

By

Published : Jan 10, 2023, 4:50 PM IST

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या गोखले उड्डाणपूल (Gokhale flyover demolish from today) बंद केल्यानंतर आता रेल्वेने गोखले उड्डाणपूल (Gokhale flyover) पाडकामासाठी सलग पाच दिवस चार चार तासांचे येणाऱ्या- जाणाऱ्या मार्गावर मध्यरात्रीपर्यंत (megablock on Western Railway line) मेगाब्लॉक आहे.

Gokhale flyover demolish from today
अंधेरीतील गोखले उड्डाण पूल आजपासून पाडणार

मुंबई : गोखले पूल 1975 मध्ये बांधण्यात आला होता. 2019 मध्ये सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यात सल्लागाराने गोखले पुलाच्या दुरुस्तीचा सल्ला दिला होता. त्यानुसार पालिकेने आपल्या हद्दीतील पुलाचे काम सुरू केले. मात्र, रेल्वे हद्दीतील गोखले उड्डाणपूल धोकादायक असल्याने रेल्वे हद्दीतील उड्डाणपूल (Gokhale flyover demolish from today) पाडून नवा बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तशा सुचना याअगोदर प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. त्या अनुशंगाने हे काम होत आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर चार दिवस मेगाब्लॉक : 7 नोव्हेंबर 2022 पासून हा उड्डाणपूल बंद करण्यात आलेला आहे. आता हा उड्डाणपूल पश्चिम रेल्वेकडून पाडण्यात येणार आहे. त्यामुळे मेगाब्लॉक (megablock on Western Railway line) 10, 11, 12, 13 आणि 14 जानेवारी रोजी मध्य रात्री 12.45 ते पहाटे 4.45 वाजेपर्यंत आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. या ब्लॉगमुळे पश्चिम रेल्वे वरील काही लोकल ट्रेन यांच्या वेळापत्रकामध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेले काम आता पुर्ण होत असल्याने नागरिकांनी याबाबात समाधान व्यक्त केले आहे.

या लोकल जलद मार्गांवरून धावणार : तसेच येणाऱ्या- जाणाऱ्या हार्बर मार्गावर (Harbor Road) रात्री 12.45 ते पहाटे 4.45 वाजेपर्यत असणार आहे. सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. विलेपार्ले येथे दुहेरी थांबा मिळेल आणि प्लॅटफॉर्मच्या अभावी राम मंदिरात थांबणार नाही. विरार ते चर्चगेट रात्री 11.40 आणि अंधेरी ते चर्चगेट रात्री 12.46 ची लोकल गोरेगाव ते अंधेरी दरम्यान जलद मार्गांवरून धावणार आहे.

अंधेरी ते विरार लोकल (Andheri to Virar Local) : मेगाब्लॉक झाल्यानंतर अंधेरी ते विरार लोकल पहाटे 4.40 वाजता सुटणार आहे. या लोकल धावणार जलद मार्गांवरून चर्चगेट ते भाईदर रात्री 11.27, 11.38, 12.09, 12.16, 12.28, 12.43, नालासोपारा रात्री 11.46, बोरिवली रात्री 11.52, 1 वाजता, विरार रात्री 11.58, 12.20, 12.50, अंधेरी रात्री 12.31 याप्रमाणे लोकल जलद मार्गावरून चालवल्या जातील. या बाबात रोज येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये या अनुशंगाने सुचनाही देण्यात आल्या आहेत. या मार्गावर येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. ती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.