मुंबई Narvekar : शिवसेना आमदार पात्र-अपात्रतेबद्दलचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच निर्णय दिलाय. त्यांनी भरत गोगावले हेच खरे प्रतोद आहेत असाही निर्णय दिलाय. त्यामुळे शिवसेना विधिमंडळ पक्षावर आता भरत गोगावले यांचा व्हिप लागू होणार आहे. तसं झाल्यास ठाकरे गटाच्या आमदारांवर भरत गोगावलेंकडून कारवाई होऊ शकते का? याची चर्चा सुरू झालीय.
घाबरवण्यासाठी उपयोग : विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. भरत गोगावले हे प्रतोद या नात्याने आता आमदारांना व्हिप बजावू शकतात. मात्र, ते आमदारांना तेव्हाच व्हिप बजावू शकतात. जेव्हा अधिवेशन असेल. नजिकच्या काळात कोणतंही अधिवेशन नाही. त्यामुळं सध्या तरी कोणताही व्हिप लावला जाणार नाही. अधिवेशनापूर्वी या संपूर्ण निकालाच्या विरोधात आणि भरत गोगावले व्हिप म्हणून असले तर त्या निर्णयाच्या विरोधातही ठाकरे गट न्यायालयात धाव घेईल. त्यामुळे या परिस्थितीला स्थगिती दिली जाईल, असं मत कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केलंय. मात्र, सध्या तरी ठाकरे गटात असलेल्या आमदारांना घाबरवण्यासाठी याचा वापर केला जात आहे, असंही सरोदे म्हणाले.
आम्ही घाबरत नाही : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार विनायक राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगावले यांना जरी व्हिप म्हणून मान्यता दिली असली, तरी आम्ही त्यांचा व्हिप जुमानणार नाही. आम्ही या सर्व निकालाच्या विरोधात न्यायालयात जात आहोत. त्यामुळे त्यांनी काहीही करण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही घाबरणार नाही असंही राऊत म्हणालेत.
गोगावले यांची व्हिपसंदर्भात स्पष्टोक्ती : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने मला पक्ष कोणाचा हे ठरवण्याची अनुमती दिली होती. त्यानुसार पक्ष कोणाचा हे ठरवताना त्या पक्षाचा व्हिप कोण हे सुद्धा ठरवणे अनिवार्य होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आपण कुठेही अवमान केलेला नाही. केवळ नव्या परिस्थितीत खरा व्हिप कोण, हे आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे गोगावले हेच व्हिप असतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा :
1 श्रीराम नवमी सणाला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा का नाही? प्रणिती शिंदेंची भाजपावर टीका
2 केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अपूर्ण प्रकल्पांच्या उद्घाटनाचा धडाका; संजय राऊतांची आगपाखड
3 श्रीराम नवमी सणाला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा का नाही? प्रणिती शिंदेंची भाजपावर टीका