ETV Bharat / state

राष्ट्र निष्ठेला समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड - सुधीर मुनगंटीवार - condolence

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने देशाने राष्ट्र निष्ठेला सर्मपित असे नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

मुंबई
author img

By

Published : Mar 18, 2019, 4:32 AM IST

मुंबई - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने देशाने राष्ट्र निष्ठेला सर्मपित असे नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

आपल्या शोकसंदेशात मुनगंटीवार म्हणतात की, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या पर्रिकरांची मनुष्यसमृद्धी अफाट होती. अतिशय वेगाने निर्णय घेणारे, ते निर्णय अंमलात आणणारे ते कर्तव्यशील आणि कार्यमग्न नेतृत्व होते. अतिशय स्वच्छ मनाचा आणि प्रतिमेचा धनी म्हणून ही त्यांची वेगळी ओळख होती. आपल्या कार्याने त्यांनी केवळ गोव्यातच नाही तर संसदेत ही वेगळा दबदबा निर्माण केला होता. ते तीनवेळा गोव्याचे मुख्यमंत्री राहिले. देशाचे संरक्षणमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द लक्ष्यवेधी होती.

उरी हल्ल्यानंतर भारताने केलेला सर्जिकल स्ट्राईक हे त्यांच्या धडाडी नेतृत्वाचे द्योतक होते. त्यांच्या सान्निध्यात येणारी व्यक्ती ही कायम त्यांच्या कार्यशैलीने प्रभावित झाली नसती तर नवलच. आजारपणात ही त्यांचा गोव्याचा विकासाचा ध्यास लपून राहिला नाही. मांडवी नदीवर बांधल्या जाणाऱ्या पुलाचे काम असो किंवा गोव्याच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प सादर करणे असो. विकास नियोजनापासून संकल्पपूर्तीपर्यंतचा त्यांचा प्रवास हा अनेकांना प्रेरणादायी होता.

माझे त्यांचे संबंध खूप जुने आणि जिव्हाळ्याचे होते. चंद्रपूरला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माझ्या प्रयत्नांना त्यांनी जोरकस सहकार्य केले. संरक्षण मंत्री असताना येथे सैनिक स्कूल सुरु करण्यास मंजुरी दिलीच परंतु, हे देशातील एक सर्वोत्तम सैनिक स्कूल व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. आज त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरत असताना ते आपल्यातून गेले याचे मनस्वी दु:ख आहे. त्यांचे निधन ही पक्षाचीच नाही तर देशाचीही कधीही न भरून येणारी हानी आहे. ईश्वरत्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ताकत देवो हीच प्रार्थना.

Intro:Body:

राष्ट्र निष्ठेला समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड - सुधीर मुनगंटीवार

मुंबई - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने देशाने राष्ट्र निष्ठेला सर्मपित असे नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

आपल्या शोकसंदेशात मुनगंटीवार म्हणतात की, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या पर्रिकरांची मनुष्यसमृद्धी अफाट होती. अतिशय वेगाने निर्णय घेणारे, ते निर्णय अंमलात आणणारे ते कर्तव्यशील आणि कार्यमग्न नेतृत्व होते. अतिशय स्वच्छ मनाचा आणि प्रतिमेचा धनी म्हणून ही त्यांची वेगळी ओळख होती. आपल्या कार्याने त्यांनी केवळ गोव्यातच नाही तर संसदेत ही वेगळा दबदबा निर्माण केला होता. ते तीन  वेळा गोव्याचे मुख्यमंत्री राहिले. देशाचे संरक्षणमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द लक्ष्यवेधी होती.

उरी हल्ल्यानंतर भारताने केलेला सर्जिकल स्ट्राईक हे त्यांच्या धडाडी नेतृत्वाचे द्योतक होते. त्यांच्या सान्निध्यात येणारी व्यक्ती ही कायम त्यांच्या कार्यशैलीने प्रभावित झाली नसती तर नवलच. आजारपणात ही त्यांचा गोव्याचा विकासाचा ध्यास लपून राहिला नाही. मांडवी नदीवर बांधल्या जाणाऱ्या पुलाचे काम असो किंवा गोव्याच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प सादर करणे असो. विकास नियोजनापासून संकल्पपूर्तीपर्यंतचा त्यांचा प्रवास हा अनेकांना प्रेरणादायी होता.

माझे त्यांचे संबंध खूप जुने आणि जिव्हाळ्याचे होते. चंद्रपूरला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माझ्या प्रयत्नांना त्यांनी जोरकस सहकार्य केले. संरक्षण मंत्री असताना येथे सैनिक स्कूल सुरु करण्यास मंजुरी दिलीच परंतु, हे देशातील एक सर्वोत्तम सैनिक स्कूल व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. आज त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरत असताना ते आपल्यातून गेले याचे मनस्वी दु:ख आहे. त्यांचे निधन ही पक्षाचीच नाही तर देशाचीही कधीही न भरून येणारी हानी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ताकत देवो हीच प्रार्थना.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.